स्वच्छ हिरवाईने नटलेला परिसर, अत्याधुनिक सुविधा, परिपूर्ण गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या समवेत असलेल्या टायपमुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी यामुळे राष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद ठरलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकला नवी दिल्ली एनबीएचे सलग दुसऱ्यांदा मानांकन मिळाले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही.बी. धुमाळ यांनी दिली आहे,
या राष्ट्रीय मानांकनाबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य धुमाळ म्हणाले की, विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा शिक्षण मंत्री व मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने चांगल्या गुणवत्तेमुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. दरवर्षीचा उत्कृष्ट निकाल, चांगली गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम, आणि विविध कंपन्याशी असलेला टायप यामुळे कॅम्पस इंटरव्यू मधून यावर्षी ६०३ विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकऱ्या मिळाल्या आहेत.
स्वच्छ व सुंदर परिसर,शिस्त, संस्थेतून पुरवल्या जाणाऱ्या अद्यावत सुविधा ,लायब्ररी, सेमिनार ,विविध उपक्रम, क्रीडांगण, सुसजलॅब ,अनुभवी, शिक्षक , प्रॅक्टिकल्स, नवीन संशोधन या सर्व बाबींचा विचार करून टेक्निकल क्षेत्रातील सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या नवी दिल्ली येथील नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडिटेशन अर्थात एनबीए या सर्वोच्च संस्थेने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील कॉम्प्युटर टेक्नोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या चार शाखांना पुढील तीन वर्षाकरिता मानांकन दिले आहे.
या मानांकनात नवी दिल्ली येथील सक्षम समितीने पॉलिटेक्निक मध्ये येऊन सर्वोच्च सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता यांची तपासणी करून सहापैकी चार अभ्यासक्रमांना 2024 ते 2027 या शैक्षणिक वर्षासाठी आपले मानांकन दिले आहे.
या मानांकनामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून या यशाबद्दल विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीतभाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ जे बी गुरव ,प्राचार्य व्ही बी धुमाळ, उपप्राचार्य प्रा. जी.बी. काळे यांसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.