सोहळा चैतन्याचा गजर भक्तीचा, पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
. प्रा.शशांक गंधे सर लिखित सोहळा चैतन्याचा गजर भक्तीचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवीन मराठी शाळेत संपन्न झाला. दै. युवा वार्ता संपादक श्री. किसनभाऊ हासे, नवीन मराठी शाळेचे चेअरमन श्री मिलींदजी सराफ, सेक्रेटरी श्री अनिरुद्ध उपासनी,संचालक श्री संदिपजी मुळे, संचालक प्रा.मुकूंद डांगे सर, मुख्याध्यापक, रावसाहेब शेरमाळे सर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ भालेराव मॅडम यांचे हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या वेळी प्रा. शशांक गंधे सरांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. किसनभाऊ हासे यांनी आपल्या जीवनात आनंदा साठी पंढरी वारी आवश्यक आहे, आपण सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे असे सांगितले.अध्यक्ष मिलींदजी सराफ आपल्या भाषणात म्हणाले, आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा, पैशाचा उपयोग आपण आपल्या साठी करतोच, परंतू सामाजिक बांधीलकी, आणि सामाजिक ऋण म्हणून आपण समाजासाठी विधायक काम केले पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाजन सरांनी केले. महाजन सरांनी विश्व प्रार्थना आणि पसायदान सुरेल आवाजात सादर केले. या कार्यक्रमाला शिक्षक बंधू, भगिनी विद्यार्थी, पत्रकार, संगमनेर साहित्य परिषदेचे सदस्य, इद्रिस शेख, देव्हारे सर, प्राचार्य दिलीप उदमले सर, महाजन सर, ज्ञानेश्वर राक्षे,बाबासाहेब मेमाणे आदी उपस्थित होते. पसायदाना ने कार्यक्रमाची सांगता झाली.