भक्ष शोधण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला ;
अथक परिश्रमानंतर बिबट्या बाहेर काढण्यात वन विभागाला यश
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी गोरक्षनाथ नारायण कर्पे यांच्या गट नंबर 196 मध्ये असणाऱ्या शेतातील विहिरीमध्ये सोमवार दिनांक 9 रोजी पहाटे साडेपाच वाजता बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की गोरक्षनाथ कर्पे यांच्या शेताजवळ खेमनर हे वाटेकरी असून त्यांना जवळच असलेल्या विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला त्यांनी ही माहिती लहानु कर्पे व दीपक अभंग यांना सांगितली अभंग यांनी तात्काळ पोलीस पाटील विनोद साळवे यांना सांगितले साळवे यांनी वनविभाग व पोलीस स्टेशन ही माहिती दिली
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल सचिन लोंढे वनपाल संगीता कोंढार, वनरक्षक राकेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दौलत पठाण अण्णासाहेब हजारे रवी पडवळे भाऊ पारासुर चंद्रकांत भोजने बाबासाहेब पर्बत हे घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी करून त्या बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षित रित्या बाहेर काढले. यावेळी या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी गंगाराम वाकचौरे बंडू मांडे लक्ष्मण राहींज लहानु कर्पे विनोद साळवे डॉ किरण काळे बाळू काळे निलेश बागुल शुभम काळे यांनी परिश्रम घेतले
तसेच या ठिकाणी बघ्यांची गर्दी जास्त असल्यामुळे गर्दीवर नियंत्रणासाठी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस एस सातपुते, ASI एस एस पाटोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बी वय टोपले, पोलीस हवालदार आठरे A V, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने प्रचंड धुमाकूळ घातला असून बिबट्याने शेळ्या कालवडी बोकडे कोंबड्या फस्त केले असून या वस्तीवर नागरिकांमध्ये अत्यंत घबराटीचे वातावरण तयार झाले असून या भागातील शेतकर्यांनी विजेच्या वेळापत्रकामध्ये बदल करून रात्र ऐवजी दिवसा वीज द्यावी अशी मागणी केली आहे तसेच या परिसरामध्ये दोन-तीन ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त उसाची शेती व व बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे ्या ठिकाणी पिंजरे लावून वन खात्याच्या कर्मचार्यांनी त्या भागाचा सर्वे करून बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी वस्तीवरील नागरिकांनी केली आहे