संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांना अकरा कोटी निधी मंजूर

 पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता पाठपुरावा 

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

संगमनेर तालुक्यातील एकूण दहा रस्यां्यना पालकमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामीण भागातील रस्तेविकासाचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये या रस्यांठासाठी निधी मंजूर झाला आहे. यासाठी या रस्यांवरच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यापैकी एकूण ८ रस्यांजूना ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल आहे.

यामध्ये तालुक्यातील निमगाव टेंभी ते हिवरगाव रस्यामासाठी २ कोटी ५० लाख, राष्ट्रीय महामार्ग ५० ते राजापूर रस्याातस १ कोटी २५ लाख तर खांबे-म्हैसगाव रस्ताला १ कोटी २५ लाख, निमोण ते तालुका हद्द निऱ्हाळे रस्या्यला १ कोटी २५ लाख तसेच धांदरफळ बुद्रुक ते कारमळा रस्या ेला ८० लाख रुपये तर मालुंजे ते अंभोरे रस्तास १ कोटी रुपये, तिगाव ते वडझरी बु. रस्तासाठी १ कोटी तसेच मेंढवण ते कोकणगाव रस्यास्साठी २ कोटी रुपये मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

यापूर्वीही तालुक्यातील विविध विकास कामांकरीता मंत्री विखे पाटील यांनी भरघोस निधीची उपलब्धता करुन दिली आहे. व्यक्तिगत लाभाचा पाठपुरावा देखील सातत्याने होत असल्याने लाभार्थ्यांना या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. रस्यांत्च्या कामांकरीता ११ कोटी रुपयांचा निधी उलपब्ध करुन दिल्याबद्दल संबंधित ग्रामस्थांनी विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!