आ.बाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्याने काकडवाडी हद्दीतील पालखी मार्गास २ कोटी ७७ लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता
संगमनेर / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय घोलप
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 अंतर्गत संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक हद्द ते काकडवाडी.(LR-10,VR -O7) या २.४० किमीच्या पालखी मार्ग रस्त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असुन सदर डांबरीकरण रस्त्यास २ कोटी ७७ लाख,५४ हजारांची अंदाजित रक्कम प्रस्तावित करण्यात आली असल्याची महिती अभियंता राहुल गायकवाड यांनी दिली आहे.सदर रस्त्यासाठी संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्याकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला असल्याची माहिती काकडवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच जनार्दन कासार,सदस्य अशोक मुळे यांनी दिली आहे.माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,महारष्ट्र सरकार व प्रशासकीय यंत्रणेचे काकडवाडी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.