पद्मश्री राहीबाई पोपेरेंच्या हस्ते दत्तात्रय घोलप यांचा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्काराने सन्मान
संगमनेर / लोकवेध live न्यूज बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते काकडवाडी गावचे सुपुत्र युवा पत्रकार दत्तात्रय रामदास घोलप यांचा पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन हॉल याठिकाणी आज रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी 12.30 वाजाता युवा धेय्य उद्योग समूहाच्या वतीने राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष रामलाल हासे, जेष्ठ पत्रकार व पर्यावरणवादी वृक्षमिञ,डॉ.संजय मेहता,संपादक लहानु सदगिर आदिंसह मान्यवर, पुरस्कार्थी उपस्थतीत होते.दत्तात्रय घोलप यांना मिळालेल्या राज्यस्तरीय धेय्यरत्न पुरस्कारबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. घोलप यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत.