पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे विद्यार्थी संविधनिक मंडळाची जल्लोषात नियुक्ती

नाशिक / लोकवेध live न्यूज 

पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे विदयार्थी संविधानिक मंडळाची नियुक्ती अतिशय उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे भारत सुरेश जाधव (मुंबई मंत्रालय), शाळेच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, श्रावणी कमुजु, विशाल मेंढे, समन्वयक शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनाने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या प्रस्तुत केलेल्या गणपती वंदनाच्या नृत्याने कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली. संविधानिक मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी अशा नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर सर्व संविधानिक मंडळातील विद्यार्थ्यांचे मार्च पास संचलन झाले. या संविधानिक मंडळात कॅबिनेट मिनिस्टर यामध्ये सत्यम गुप्ता (प्रेसिडेंट), सोहम पाटील(वॉइस प्रेसिडेंट), देविका दौंड (प्राईम मिनिस्टर), पार्थ साखरे (होम मिनस्टर), रुची गायकवाड (फायनान्स मिनिस्टर), तनुश्री वानले(हेल्थ मिनिस्टर), अक्षदा उगले( इन्फॉर्मेशन & ब्रॉडकॅस्टिंग मिनिस्टर), श्रेयस जाधव ( ट्रान्सपोर्ट मिनिस्टर), अंशुल ननावरे( स्पोर्ट मिनिस्टर), कृष्णम लाहोटी(लॉ & जस्टिस मिनिस्टर), स्तक्षा क्षीरसागर(कल्चरल मिनिस्टर)या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. इंडिपेंडेंट मिनिस्टर यामध्ये डिसिप्लिन सेक्रेटरी हिमानीश साहू ,राज ठाकरे, रिमशा सिन्हा, आराध्या तुपके, असेंबली सेक्रेटरी निधी धनवटे, आर्यन जोंधळे, क्लिनलीनेस सेक्रेटरी सम्यक गमित, शौर्य गोसावी, विधी देशमुख, माधवी नागरे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. हाऊस सेक्रेटरी यामध्ये एक्वा हाऊस सेक्रेटरी श्रेयस रणपिसे, टेरा हाऊस सेक्रेटरी रेणुका खापरे, इग्निस हाऊस सेक्रेटरी अनन्या कमूजू आणि वेंटस हाऊस सेक्रेटरी आर्यन सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रिफेक्ट यामध्ये वरद पानगव्हाणे, अभिराज नाईक, श्रेयस अहिरे, स्निग्धा पांडे, वैष्णवी हिंगोणेकर आणि भक्ती लोहार यांचा सहभाग होता. या सर्व संविधानिक मंडळातील उमेदवारांना प्रमूख पाहूणे भारत जाधव, प्रा. डॉ. जसिंथा पारके आणि पालकांच्या हस्ते बॅचेस, सॅचेस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर एक्वा हाऊस समन्वयक शिक्षक नितीन ठाकरे, टेरा हाऊस समन्वयक शिक्षक मनिषा आधांगळे, इग्नीस हाऊस समन्वयक शिक्षक प्रियंका गोराडे, वेंटस हाऊस समन्वयक शिक्षक शितल देशमुख यांना देखील बॅचेस, सॅचेस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमूख पाहूणे भारत जाधव यांनी आपल्या मनोगतातून सर्व संविधानिक मंडळातील विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना प्रेरित देखील केले. प्रा. डॉ. जसिंथा पारके यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी प्रेरित केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सर्व आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक राकेश शर्मा यांच्या नियंत्रणात उत्स्फूर्तपणे पार पाडण्यात आले. या सर्व कार्यासाठी त्यांना शाळेच्या प्रा. डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मेघा कमानकर आणि अमृता देवकर यांनी पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!