आई वडील हेच प्रथम खरे गुरू
सर्व प्रथम गुरूपौणिमेच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, गुरूपौणिमा साजरी करण्यामागे खरं कारण म्हणजे या दिवशी शिष्य पुजा करून किंवा त्यांच्या गुरूंना आदर देऊन त्यांच्या शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, तसेच गुरूपौणिमा ही पारंपारीक पणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते,
भारतीय परंपरेत गुरूपौणिमा ही हजारो वर्षे साजरी केली जात आहे आणि आजही उत्सव टिकुन आहे,भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते, गुरूच्या गुणांचे स्मरण करून आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे,पौणिमा ही अशी वेळ मानली जाते जेव्हां चंद्राची उर्जा शिखरावर असते,पृथ्वीवर सकारत्मता आणि प्रकाश पसरवते.पौणिमा ही उच्च अंतर्ज्ञान,भावनीक स्पष्टता आणि आध्यात्मिक प्रबोधनाशी संबधीत आहे,वैयक्तीक वाढ आणि ज्ञानप्राप्ति साठी हा शुभ काळ मानला जातो,
आषाढ महिन्यातील पौणिमा तिथीला गुरु पौणिमा साजरी केली जाते, गुरूपौणिमेचा सण भारत ,नेपाळ,आणि भुतान मध्ये हिंदु, जैन,आणि बौद्ध धर्मियाद्वारे साजरा केला जातो,बौद्ध परंपरेनुसार हा सण बौद्ध लोक बुद्धाच्या सन्मानार्थ साजरा करतात,ज्यांनी या दिवशी आपला पहिला उपदेश सारनाथ,उत्तरप्रदेश भारत येथे दिला,योगिक परंपरेत हा दिवस साजरा केला जातो जेव्हां शिव हे पहिले गुरू बनले,गुरूपौणिमेच्या दिवशी लोक त्यांच्या आदरणीय गुरु मार्गदर्शक,शिक्षक, आणि आई वडीलांचे आशिर्वाद घेतात,हा दिवस नवीन अभ्यास,काम,नौकरी सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो आणि विविध मंत्र आणि धार्मिक पुस्तकांचे व ग्रंथाचे पठण सुरू करण्यासाठी देखील हा दिवस पवित्र व शुभ मानला जातो,गुरूपौणिमा हा आत्मचिंतन आणि आध्यात्मिक वाढीचा काळ आहे, विद्यार्थ्याना आणि शिष्यांना त्यांच्या आध्यात्मिक वैयक्तीक प्रवासाबद्दल विचार करण्यास,त्यांच्या शिकवणी व धड्याबद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल पुन्हा विचार करण्यास आणि त्यांच्या गुरुचे आशिर्वाद मागण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, जे त्यांना पुढे प्रगति करण्यास मदत करतील, गुरू अनेक परंपरा मध्ये आणि जीवनाच्या पद्धतीमध्ये,अनेकदा शहाणपण,मार्गदर्शन आणि प्रेरणा स्त्रोत म्हणुन पाहिले जाते,गुरू किंवा शिक्षक अशी व्यक्ति आहे जी लोकांना आध्यात्मिक वाढ आणि ज्ञानप्राप्तिच्या मार्गावर जाण्यास मदत करते,त्यांना अज्ञान,अहंकार आणि आवडीच्या रूपांत येणाऱ्या मार्गातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी मदत करते,
जगात खरा गुरु आपल्या परंपरेत स्वतः हा ईश्वर मानला जातो, गुरु तो असतो जो त्यांच्या आंतरिक सामर्थ्याने अंधार दूर करू शकतो,अज्ञान दूर करू शकतो आणि दिक्षाला प्रकाश,सत्य आणि आनंदाच्या क्षेत्रात नेऊ शकतो,गुरुचे खालीलप्रमाणे प्रकार आहे १)सुचक गुरु -जे आपल्याला शाळा आणि संस्था मध्ये वेगवेगळे विषय शिकवितात ,२)वाचक गुरु -जो वकृत्व करतो आणि देव कोण आहे यावर मार्गदर्शन करतो,३) बौद्ध गुरू -जे तुम्हाला आध्यात्मवाद आणि ज्ञानसंबधीत पद्धतीबद्दल मार्गदर्शन करतात,४)निशिध गुरु -जो तुम्हाला वाईट अशा इत्तराचे नुकसान करण्याच्या काळ्या तंत्राच्या युक्त्या शिकवतो,ज्ञानी पुरूष अशा प्रकारचे गुरू टाळतात,अशाप्रकारे आजच्या गुरूपौणिमात्ताच्या निमित्ताने वेगवेगळय़ा गुरु बद्दल गुरूची कितीही माहिती सांगितली तरी ती कमीच आहे,पंरतु माझ्या आजवरच्या आयुष्यभरात माझे आई वडील हेच माझे खरे गुरू राहिलेले आहे, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही,त्यामुळे शेवटी एवढंच सांगेल आई तुच माझी पहिली गुरू तुझ्यापासुन हे जग सुरू आजच्या गुरूपौणिमेच्या दिवशी तुला त्रिवार अभिवादन! पुन्हा एकदा गुरूपौणिमेच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
श्री.सुभाषराव हळनोर,उपजिल्हा प्रमुख यशवंत सेना