रयतचे सच्चिदानंद झावरे व प्रा. कांडेकर मंगल उर्फ झावरे मंगल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

 निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख सच्चिदानंद झावरे व व डी.के.मोरे जनता जुनिअर कॉलेज वडगाव पान ता.संगमनेर येथील प्राध्यापिका सौ कांडेकर मंगल पांडुरंग उर्फ सौ मंगल सच्चिदानंद झावरे यांना युवा ध्येय संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ध्येय गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गणितज्ञ व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे,युवा उद्योजक नितीन एडके व युवा ध्येयचे अध्यक्ष लहानु सदगीर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादु कडू पाटील विद्यालय, सात्रळ येथे कार्यरत असलेल्या सच्चीदानंद झावरे हे विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी अनेक प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवत असतात एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे प्रा.मंगल कांडेकर उर्फ झावरे मंगल यांनी सह्याद्री जुनियर कॉलेज,संगमनेर व डी के मोरे जनता ज्युनिअर कॉलेज वडगाव पान या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे कृतीशील उपक्रम राबवलेले आहेत. या अगोदर झावरे सर यांना व्होडाफोन आयडियाची एक लक्ष रुपयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती व रयत शिक्षण संस्थेचे कृतिशील पुरस्कार मिळालेले आहेत. श्री व सौ झावरे यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष अरुण कडू पाटील संभाजीराव चोरमुंगे, प्रगती पतसंस्थेचे चेअरमनॲड.विजयराव कडू,बबनराव कडू, पत्रकार किशोर भांड,भास्करराव फणसे,युवा नेते किरण पा.कडू ,पंकज पा.कडू,भाऊसाहेब पेटकर,प्राचार्य राजेंद्र बडे,पर्यवेक्षिका एस.आर.थोरात,सर्व शिक्षक व सेवक वृंद व शिक्षक प्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!