दहशतीचे राजकारण जनता सहन करणार नाही- आ. थोरात

आश्वी येथे अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ

संगमनेर  / लोकवेध live न्यूज 

आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने आणि विकासाचे राजकारण केले म्हणून जनता सातत्याने आपल्या सोबत आहे. त्यांचे सुरू असलेले दहशतीचे आणि जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नसून दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आश्वी बुद्रुक येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, ॲड .माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, कृषीभूषण सौ प्रभावतीताई घोगरे, डॉ. जयश्रीताई थोरात ,बाबासाहेब ओहोळ, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड, डॉ. राजेंद्र पिपाडा, गणपतराव सांगळे, गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, ॲड नारायणराव कारले, राजेंद्र चकोर, ॲड .नानासाहेब शिंदे, विजय हिंगे, सुमतीलाल गांधी, नवनाथ महाराज आंधळे, सुरेश थोरात, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच सौ अरुणा हिंगे, गीताराम गायकवाड, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, अशोक सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदींसह संगमनेर व राहता तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, अमृतवाहिनी बँकेने गोरगरिबांना मदत केली असून 500 कोटींपेक्षा जास्त ठेवी या बँकेमध्ये आहे. आश्वी ची शाखा ही चांगल्या कामातून नावारूपास येणार असून लवकरच राहत्या मध्येही शाखा सुरू करण्यात येईल. दहशत व दडपशाही असतानाही आश्वी व परिसराने 25 वर्ष सातत्याने मोठे मताधिक्य दिले .आपण विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांची ही कामे केली.

मागील अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. यासाठी पाठपुरावा केला. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे व विकासाचे राजकारण केले ही आपली परंपरा आहे.

मात्र या उलट या परिसरामध्ये मोठी दहशत आहे .विरोधी गावचा सरपंच असेल तर अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष या लोकांनी नेऊन ठेवले आहे. जिरवा जिरवीचे आणि दमदाट्याचे राजकारण फार काळ चालत नाही. दहा वर्ष गणेश तुमच्या ताब्यात असताना चांगला चालवता आला नाही .आमची भावना आणि उद्देश चांगला म्हणून गणेश कारखाना अत्यंत चांगला चालला मात्र. त्यामध्येही अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. गोरगरिबांच्या प्रपंचाशी खेळू नका सत्तेचा गर्व जनतेने उतरवला आहे. संगमनेर प्रमाणे राहता आणि शिर्डीमध्येही चांगले वातावरण निर्माण करू असेही आमदार थोरात म्हणाले

तर मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे देशातील सहकाराचे आदर्श मॉडेल आहे. भाजप सरकारने जनतेला अनेक भूलथापा दिल्या मात्र जनतेने त्यांचा बुरखा फाडला आहे. अगदी आयोध्या मध्ये सुद्धा पराभव केला आहे. जीएसटीतून मिळणारा पैसा हा सरकारचा नसून गोरगरिबाचा आहे .त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले

कृषीभूषण सौ प्रभावती ताई घोगरे म्हणाल्या की, संगमनेर मध्ये अत्यंत शांततेचे संस्कृतपणाचे आणि विकासाचे राजकारण आहे .मात्र राहता तालुक्यामध्ये दडपशाही आणि हुकुमशाही आहे. हम करे सो कायदा निर्माण झाला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही. दुधाला भाव नाही. पाण्याची बाटली महाग आहे अशा प्रवरेच्या नेत्यांनी गोरगरिबांना देवच आठवायला लावला आहे. पण आता जनता जागृत झाली असून आता ही दडपशाही विरुद्ध आवाज उठवला जाईल असेही त्या म्हणाले

तर डॉ राजेंद्र पिपाडा म्हणाले की ,राहता तालुक्यामध्ये खोट्या केसेस दाखल करणे ,विनयभंग, ॲट्रॉसिटी यासारख्या खोट्या केसेस दाखल केल्या जात आहे. अत्यंत दडपशाहीचे राजकारण सुरू आहे .राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरूनही राजकारण केले गेले. या हुकूमशाहीच्या राजकारणामुळे राहता तालुका संपूर्णपणे अस्वस्थ असून आपण भाजप वरिष्ठांकडेही येथील  नेतृत्वाची तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ जयाताई थोरात, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचीही भाषणे झाली

या कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक किसन सुपेकर, संजय थोरात ,राजेंद्र काजळे,  लक्ष्मण खेमनर ,शिवाजी जगताप ,श्रीकांत गिरी ,अविनाश सोनवणे ,बाबुराव गुंजाळ, किसनराव वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, श्रीमती ललिता दिघे , सौ कमल मंडलीक कचरू फड ,ब्रिज मोहन बिहानी, बाबुराव जराड, अभिजीत ताजने, आझर शेख, संतोष ताजने ,बाळासाहेब मदने, सौ प्रतिभाताई सोमनाथ जोंधळे ,सौ मीनाताई थेटे,लक्ष्मण डेंगळे, किरण बोरसे, सुरेश जोंधळे, दिनकर आंधळे,आदींचा विविध मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमाचे स्वागत विजय हिंगे यांनी केले .प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी आश्वी बुद्रुक व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

तुमची लोकसभेत जनतेने दमछाक केली आता तुम्ही कुटुंबाला वेळ द्या

लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या उमेदवार आता राहता, संगमनेर मध्ये उभ्या राहण्याच्या बतावणी करत आहेत .अरे बाबा नगर दक्षिण मध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या .वाटलं तर व्यवसाय करा असा मिश्किल टोला सौ प्रभावती घोगरे यांनी सुजय विखे यांना लगावला

शिर्डी मतदारसंघात  खोट्या केसेस दाखल करण्याचे सत्र सुरू – डॉ पिपाडा

राजकारण हे जनतेच्या विकासाचे झाली पाहिजे. मात्र शिर्डी मतदार संघामध्ये दडपशाही आणि हुकूमशाहीचे राजकारणातून सध्या ॲट्रॉसिटी, विनयभंग खोट्या केसेस दाखल करून धाक निर्माण केला जात असून याविरुद्ध भाजप नेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचे डॉ. पिपाडा यांनी म्हटले आहे

आमदार थोरात यांचे भव्य स्वागत

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची अश्वि व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत जोरदार स्वागत करताना सर्वांनी भावी मुख्यमंत्री आमदार थोरात यांचा उल्लेख करताना प्रचंड टाळ्यांचा गजर व जोरदार घोषणाबाजी केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!