आदर्श कुटुंब वत्सल,धार्मिक व्यक्तिमत्व = कै. मुरलीधर दादा
कनोली येथील सावळेराम गणपत वर्पे यांचे कुटुंब म्हणजे एक आदर्श शेतकरी कुटुंब म्हणून संगमनेर तालुक्यातील कनोली तसेच पंचक्रोशीत प्रसिद्ध होते गावातील सर्वात मोठे कुटुंब आणि आदर्श कुटुंब म्हणून या कुटुंबाकडे पाहिले जात सावळेराम वर्पे यांना एकूण आठ अपत्य होती त्यात पाच मुले विठोबा वर्पे निवृत्ती वर्पे त्र्यंबक वर्पे नाना वर्पे व मुरलीधर वर्पे आणि तीन मुली झेल्याबाई शिरसाट, सत्यभामा यादव, रुक्मिणी शिंदे असा हा मोठा परिवार या परिवारातील आदर्श व्यक्तिमत्व कै. मुरलीधर दादा वर्पे यांचा जन्म कनोली येथे 1932 साली झाला यांचे ८/१०/२०२४ वयाच्या 94 वर्षी वृद्ध काळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे कै.मुरलीधरदादांना 14 पुतणे 10 पुतण्या 21 नातू 22 नाती 23 पणतू- पणती हा दादांचा मोठा परिवार आहे
कै. मुरलीधर दादांचे शिक्षण अवघे चौथी पास तरीही उच्चशिक्षित तरुणांनाही लाजवेल असं दादांचं कार्य होतं दादांचा सर्व क्षेत्रात अभ्यास फार होता दादांना कुस्तीची फार आवड होती वडिलांपासून त्यांना कुस्तीचे धडे मिळाले तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर त्यांचा कुस्तीमध्ये दबदबा होता वयाच्या पंचविसाव्या वर्षी आश्वी येथील भोसले परिवारातील द्रोपदाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला
कुटुंबाच्या प्रगतीमध्ये दादांचे भाऊ व पत्नीचा मोलाचा वाटा राहिला प्रपंचाचा गाडा हाकत असताना त्यांनी कुस्तीचा वारसाही जपला असे असताना त्यांना तीन अपत्य झाली बाबासाहेब, भास्कर, कै दिनकर. तिघांनीही चांगलं शिक्षण घेतलं परंतु बाबासाहेब यांनी फक्त नोकरी केली संगमनेर कारखान्यात इंजिनीयर म्हणून त्यांनी नोकरी केली ते सध्या रिटायर आहेत भास्कर आणि कै दिनकर यांनी शेती उत्तम प्रकारे करत कुटुंबाला मोठा हातभार लावला कुटुंबाची प्रगती होण्यासाठी भावांचा मुलांचा पुतण्याचा मोलाचा वाटा राहिला कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय सर्व कुटुंब एकत्र बसून घेत असे प्रत्येकाची मत जाणून घेतली जात असे सर्व भाऊ एक विचारी असल्याने कुटुंबाची प्रगती अतिशय वेगाने झाली अनेक ठिकाणी शेती खरेदी केली एकत्रित कुटुंबामुळे त्यांचा गावात सर्वच क्षेत्रात चांगलाच दरारा होता गावातील आदर्श कुटुंब व्यवस्था म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे तालुक्यात व जिल्ह्यात त्यांचे नातेसंबंध मोठ्या प्रमाणावर आहे
राजकीय जीवन
कै.मुरलीधरदादा यांचा कुस्तीमुळे जनसंपर्क प्रचंड प्रमाणावर वाढला त्यातूनच हळूहळू राजकीय सामाजिक क्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व तत्त्वनिष्ठ वागणं गोरगरिबांना प्रति प्रेम भावना अडचणीत असलेल्यांना मदत करणे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती या सर्व गोष्टींबरोबरच त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही व इतरांनाही तोच सल्ला देत राहिले त्यांच्या या सत्यवचनी स्वभावामुळे गावातील वादात योग्य न्याय निवडा करण्यात त्यांचा हातखंड होता योग्य निर्णय क्षमता होती या स्वभावामुळे लोकांनी त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली त्यात ते प्रचंड मतांनी निवडून आले सर्व सदस्यांनी मिळून त्यांना एक मताने सरपंच पदी नियुक्ती केले त्यानंतर त्यांनी सलग पंचवीस वर्षे कनोली गावचे सरपंच म्हणून कारभार पाहिला त्याचप्रमाणे विविध सेवा सोसायटी बालाजी दूध संस्था या संस्थेचे चेअरमन पद ही भूषवले गावच्या हायस्कूलमध्ये स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य म्हणून शेवटपर्यंत राहिले त्यांच्यातील राजकारणातील विविध पैलू हेरत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी त्यांना अमृतवाहिनी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड केली यानंतर त्यांनी तालुक्याची जबाबदारी घेतली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ते अग्रस्थानी होते त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता तालुक्यात राजकीय जीवनात तालुक्यातील पदे भूषवित असताना गावातील जुने व नवे यांचा मेळ घालत अनेक कार्यकर्ते घडविले व गावात त्यांना विविध पदावर संधी दिली सरपंच चेअरमन विविध स्थानिक संस्थावर महत्त्वाची पदे दिली आपल्याकडील तालुका पदाचा त्याग करत गावातील तरुणांना तालुक्यातील पदांवर संधी दिली त्यातील काही व्यक्ती आजही तालुक्याच्या राजकीय पदावर काम करत आहे त्यांचा राजकीय वारसा त्यांचा मुलगा कै दिनकर वर्पे यांनी सुरू ठेवला त्यांनी अमृतवाहिनी बँकेचे संचालक पद भूषवले तर त्यांची सून मिराबाई सुधाकर वर्पे संगमनेर कारखान्यात विद्यमान संचालक आहेत तसेच गावातील ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा सोसायटी दूध संस्था यामध्ये पुतणे नातू विविध पदांवरती कार्यरत आहे
सामाजिक कार्य
कै. मुरलीधरदादा सरपंच होण्याच्या आधी गावात विविध समस्या होत्या रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न यासारखे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते परंतु दादांनी या सर्व समस्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व बाळासाहेब थोरात,व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यामार्फत गावातील रस्त्यांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अगदी सहजतेने सोडवला गावातील पाणीपुरवठ्या साठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रवरा नदीवरून पाईपलाईन आणून गावाला पाणी पुरवले सोसायटी मार्फत लोकांना कर्ज काढून देऊन त्यांच्या विकासाला चालना दिली गोरगरिबांना प्रपंचात आर्थिक स्वरूपात धान्य स्वरूपात मदत केली मुलांना शिक्षणात नेहमी ते मदत करत असे उद्योग व्यवसाय त्यांची दूरदृष्टी होती गावातील पहिली पीठ गिरणी त्यांनी सुरू केली गावातील हायस्कूल उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांचा मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष असायचे ते नेहमी म्हणायचे मोठ्यांची मुले शहरात शिकतील परंतु गोरगरिबाची मुले कुठे जातील ते शिकले पाहिजे शिक्षणातूनच गावची प्रगती होईल असे त्यांचे विचार होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या कडे गावात हायस्कूल सुरू करावे ही महत्वपूर्ण मागणी केली यासाठी गावातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि गावात हायस्कूल उभं केलं त्यामुळे गोरगरिबांची मुलं शिक्षण घेऊन मोठ-मोठे अधिकारी झाले शिक्षणाबरोबर धार्मिकतेतही त्यांचे मोठे योगदान राहिलं गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व मंदिरातील सर्व देवांची प्राणप्रतिष्ठा दादांच्या हस्ते झाली ते नारायण गिरी महाराजांचे शिष्य होते गावातील सप्ताहात त्यांचे मोठे योगदान असायचे गावचा सर्वांगीण विकास व्हावा हाच त्यांचा ध्यास त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला म्हणून ते कनोली करांच्या मनात दादा म्हणून कायम राहिले.
कै मुरलीधरदादा हे नेहमी सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कौटुंबिक या सर्व क्षेत्रात ते अग्रेसर राहिले कुटुंब वत्सल स्वभावामुळे ते घरात सर्वांच्या आवडते दादा होते त्यांनी वडील म्हणून सर्व कार्य व्यवस्थित पार पाडले तर भाऊ म्हणून भावाचे सर्व कार्य व्यवस्थित पार पाडले असे आमचे दादा आम्हाला पोरके करून आमच्यातून निघून गेले त्यांची कुटुंबातील उणीव कधीही भरून निघणार नाही
सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास आणि कष्ट ज्यांच्या जवळ आहे ते कधीच अपयशी होत नाही ते कायमस्वरूपी स्मरणात राहतात
फुलांच्या सुगंधाला चोरता येत नाही सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही कितीही दूर का असेना आपली माणसं व त्यांची आठवण विसरता येत नाही म्हणून ज्या रंगांनी आयुष्य घडविले असाच एक रंग कै मुरलीधरदादा च्या रूपाने आमच्या कुटुंबाचा पांडुरंग हरवला
समस्त वर्पे परिवार व कनोली ग्रामस्थ