नोटरी केलेली जागा दुसऱ्याच्या नावावर केली ; पत्रकाराची फसवणूक
पत्रकाराला फसवणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
तालुक्यातील चिखली येथील एकाने नोटरीवर केलेल्या जागेची परस्पर दुसऱ्याच्या नावावर नोटरी करून शहरातील एका पत्रकाराला फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यक्ती च्या विरोधात संगमनेर शहर पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांची माहिती अशी की संगमनेर शहरामधील साई मंदिर येथे राहत असणारे पत्रकार भारत रेघाटे यांनी २०१४ मध्ये संगमनेर तालुक्यातील चिखली गावातील भानुदास बाळकृष्ण हासे याच्याकडून २ गुंठे जागा घेतली होती. खरेदीचा करारनामा करत जागा नावावर करून देतो, असे हासे याने सांगितले. यानंतर १ एप्रिल २० १४ रोजी नोटरी करून खरेदी करारनामा करून घेतला. नोटरी दरम्यान रेघाटे यांनी हासे यास ७१ हजार रुपये रोख दिले.तर खरेदीची उर्वरित ७१ हजार रुपये रक्कम ही चेक आणि रोख स्वरूपात अशी १ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम रेघाटे यांनी भानुदास हासे याला दिली होती. नोटरी प्रमाणे खरेदी केलेली २ गुंठे जमीन हासे याने रेघाटे यांच्या नावावरती करून दिली नाही. खरेदी केलेल्या जागेला रस्ता नसून रस्ता करून देण्यासाठी २० हजार लागेलं असे हासे याने रेघाटे यांस सांगितले त्यानंतर रेघाटे यांनी पुन्हा २० हजार रुपये हासे यास रोख दिले. परंतु त्यानंतरही दोन गुंठे जागा खरेदी करून दिली नाही. नोटरी प्रमाणे खरेदी केलेल्या दोन गुंठे जागेवर पोल रोवले असता हासे याने सदरचे पोल काढून टाकले. याबाबत रेघाटे यांनी ग्रामपंचायती मध्ये
बांधकाम करण्याची परवानगी मागण्याचा अर्ज केला. ग्रामपंचायतीने आधी बांधकाम करा ऩंतर नोंद करतो असे सांगितले.
माझी जागा माझ्या नावावर करून द्या असे रेघाटे यांनी हासे यांच्याकडे मागणी केली. मात्र दोन गुंठे जागा नावा वर झाली नाही. रेघाटे यांनी चौकशी केली असता नोटरीवर व्यवहार केलेला दोन गुंठ्याचा प्लॉट हा हासे याने त्याच्या नाते वाईकाला विकला असल्याचे रेघाटे यांना समजले. त्यानंतर हासे याने तर आपली घोर अशी फसवणूक केली असल्याचे रेघाटे यांच्या लक्षात आले. त्यांनी यानंतर थेट शहर पोलीस ठाणे गाठले अन शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भानुदास बाळकृष्ण हासे याच्या विरोधात कलम 420 फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस तपासात नेमके काय उघड होते याकडे रेघाटे यांचे लक्ष लागून आहे.
नोटरी वर केलेल्या जागा बाळकृष्ण हासे यांनी परस्पर दुसऱ्या नातेवाईकाला विकली असल्याचे समजले .त्यानंतर पत्र कार भारत रेघाटे यांनी संगमनेर उपविभा गाचे तात्कालीन उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तत्कालीन पोलीस उपाधीक्षक चिखलीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तंटामुक्ती अध्यक्ष कामगार पोलीस पाटील यांच्या कडे अनेकवेळा कागदोपत्री न्याय मागि तला परंतु त्यांना न्याय मिळाला नाही त्या नंतर रेघाटे यांनी संगमनेर उपविभागाचे विद्यमान प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि पोलीस उपाधी क्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पुढेआपली कैफियत मांडली त्या नंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्याचेपोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुन्हादाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता गुन्हा दाखल झाला आहे परंतु अद्याप बाळकृष्ण असे यास पोलिसांनी ताब्यात घेतली नाही त्यामुळे रेघाटे यांना न्याय मिळतो की त्यांचे पुन्हा हेलपाटे सुरूच राहतात याकडे आता लक्ष लागून आहे.
या संदर्भात तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार, मुकुंद देशमुख, राजेंद्र भोसले, भगवान मथुरे तर पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम विद्यमान पोलीस उपा उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे तत्कालीन प्रांत अधिकारी शशिकांत मंगरूळे विद्यमान प्रांताधिकारी शैलेश हिंगे पत्र व्यवहार व पाठपुरावा केल्याने अखेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
