अन्यथा मोठा अपघात झाला असता…महामार्गावर पडलेले बाभळीचे झाड आदित्य घाडगेंनी केले बाजूला..!!

संगमनेर / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय घोलप 

आज सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी सकाळी अज्ञात वाहनाच्या धक्याने लोणी,तळेगाव-नांदुर-शिंगोटे महामार्गावर नान्नज दुमाला गावानाजिक एक बाभळीचे झाड रस्त्यात पडलेली आहे.त्यामूळे एका बाजूचा रस्ता पूर्णतः बंद झाला आहे.झाड बाजूला न केल्यास अपघात होऊ शकतो अशा प्रकारचे पोस्ट सोशल मीडियावर पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी व्हायरल केली होती. याचीच दखल आज सायंकाळी 4 वाजेच्य सुमारास यशस्वी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,निराधारांचा आधार,समाजसेवक आदित्य घाडगे यांनी तात्काळ घटनास्थळावर येत सदर तुटलेली बाभळीचे झाड स्थानिक नागरिक किरण आप्पा चत्तर यांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने तात्काळ बाजूला केले.त्यामुळे पुढील होणारा संभव्य मोठा अनर्थ अथवा अपघाताची घटना टळला आहे.पत्रकार दत्तात्रय घोलप,साईराम चत्तर,शिवा नेटके,शशिकांत आहेर यांनी याकमी समाजसेवक आदित्य घाडगे यांचे आभार मानले आहे.पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या कडून स्थानिक व संबंधित प्रशासनाला महामार्गवर पडलेल्या झाडा संदर्भातची माहिती माध्यमातून कळवण्यात आली होती.मात्र प्रशासनाकडून कुठल्या प्रकारचे दखल घेतली गेली नाही.उलट घटनेची माहिती समजताच समाजसेवक आदित्य घाडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या साह्याने महामार्गावर पडलेले बाभळीचे झाड तात्काळ बाजूला केले. त्यांच्या या समाजसेवेच्या कार्य तत्परतेबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!