निर्मिती कॉलनी CCTV निगराणीखाली
संगमनेर / लोकवेध live न्यूज
इंदिरानगर गल्ली क्रमांक ९ मधील निर्मिती कॉलनीमध्ये सुरक्षिततेसाठी नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.सध्या शहरांमध्ये दुचाकी व सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कॉलनीतील घरांची व दुचाकी, चार चाकी गाड्यांची सुरक्षितता घ्यावी. म्हणून कॉलनीतील सर्व निवासी धारक मंडळी एकत्र येत कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरवले.त्यासाठी येणारा २२ हजार रुपये खर्च सर्वांनी वर्गणी जमा करत केला. नुकतेच कॉलनीत चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे प्रक्षेपण कॉलनीतील सर्वांच्या मोबाईल मध्ये तसेच एका संगणकावर २४ तास सुरू असते.त्यामुळे निर्मिती कॉलनीचा सर्व परिसर सीसीटीव्ही निगराणी खाली आला आहे.
हा उपक्रम शहरातील इतर कॉलनीतील लोकांना प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.
या उपक्रमासाठी कॉलनीतील सुखदेव शेळके, भानुदास पोखरकर, गोपळा गायकवाड,राधाकिसन रहाणे, बाबासाहेब बुचुडे, दिगंबर श्रीगादी,मनोज धात्रक,सचिन जाधव, सचिन जुंद्रे,ज्ञानदेव गलांडे, दिलीप कासार,शिवाजी भुरके,उत्तम एरंडे, सोमनाथ मदने आदींनी विशेष परिश्रम घेतले.
