रक्त निर्मिती व रक्तदान  फक्त मानवच  करू शकतो – रेव्ह मच्छिंद्र जगताप 
 रेव्ह मच्छिंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
मानवी जीव वाचवण्यासाठी मानवी रक्तच लागते . आणि मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते आज पर्यंत जरी मानवाने अनेक शोध लावले परंतु रक्ताची निर्मिती मानव करू शकला नाही म्हणूनच मानवी प्रत्येक जीव मोलाचा आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून रक्तदान करावे  सर्वच गोष्टी पैशात मोजता येत नाही आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो त्यामुळे आपण रक्तदान केले पाहिजे. असे प्रतिपादन मच्छिंद्र जगताप यांनी केले 
 संगमनेर तालुक्यातील कनोली येथील गॉड्स असेंबल मिनिस्ट्री  संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 2 जून रोजी  रेव्ह.मच्छिन्द्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या
 अध्यक्षा उज्ज्वला जगताप व मच्छिंन्द्र जगताप यांच्या हस्ते झाले.
 यावेळी संतोष रोहम निलेश रोहम डॉक्टर शैलेश तोरकडी पॅथॉलॉजिस्ट श्री प्रदीप जाधव सर आधी सह रक्तदाते ग्रामस्थ उपस्थित होते
जन्मदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त हे सामाजिक कार्य होत असल्याने सर्व स्तरांतून या शिबिराचे स्वागत झाले.
 रेव्ह मच्छिंद्र जगताप यांना नुकताच समाजभूषण पुरस्कारही मिळाला आहे
 रक्तदात्यांना आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आली.
सभासदांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या
शिबिराला प्रतिसाद मिळाला असून तब्बल २५ जणांनी रक्तदान केले.
आधार रक्तपेढी या संस्थेने रक्तदात्यांकडून रक्त संक्रमण करून घेतले.
आधार रक्तपेढीचे प्रमुख डॉ. शैलेश तोरकडी सर व श्री .प्रदिप जाधव सर यांनी शिबिराला उपस्थिती लावून शिबिराचे आयोजन
केल्याबद्दल आभार मानले.रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत समाजात एक नवीन प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे
सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम यांनी त्यांच्या सामाजिक कामाचा उल्लेख करत म्हटले की आपल्या परिसरात एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहे याबद्दल देवाचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.
निलेश रोहम यांनी शुभेच्छा देताना नुकतेच मच्छिन्द्र जगताप सर यांना पिपंरणे या गावात समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते, खरोखर समाज उपयोगी काम सर करत आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!