पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या पाठपुरावाने पालखी रस्ता दुरुस्तीस प्रारंभ..

जिल्हाधिकाऱ्यांकडून दाखल.!!

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे सुपुत्र तसेच रयत शेतकरी संघटना संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक, काकडवाडी, चिंचोली गुरव- तळेगाव दिघे रस्त्याला जोडणाऱ्या पालखी मार्गाची दुर्दशा झाली असून. पावसाने सदर खड्ड्यात पाणी साचून गटारगंगा बनत आहे.याची लवकरात लवकर दुरुस्त करावी या संदर्भात मागणी केली होती.मागणीला तात्काळ चारच दिवसात यश आले आहे.यासंदर्भातचा पाठपुरावा पत्रकार दत्तात्रय घोलप व काकडवाडी ग्रामस्थांनी थेट अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केला होता.जिल्हाधिकारी यांनी तात्काळ त्यांच्या टीमला पाठवून श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रस्त्याच्यया झालेल्या दुर्दशाची पाहणी केली व उपयोजना करण्यासंदर्भात सुचित केले होते.याच पार्श्वभूमीवर ठेकेदार निखिलशेठ जगताप यांनी पालखी रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात केली असून काकावडी ग्रामस्थ व काकडवाडी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!