आता कोणीही शिका संस्कृत ; संगमनेर मध्ये होणार विनामूल्य संस्कृत शिबिर

संगमनेर /लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र द्वारा विनामूल्य संस्कृत भाषा शिका शिबिराचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आलेले आहे.
दि. २० जून ते २९ जून दरम्यान गणेशनगर व बाजारपेठ अशा दोन ठिकाणी हे शिबिर होणार आहे. दहा दिवस चालणा-या या शिबिरात दोन तास संस्कृत शिकवले जाणार आहे. ज्यांना संस्कृतचे प्राथमिक ज्ञान नाही अथवा १५ वर्षा पुढील कोणीही या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. या शिबिराद्वारे आपण संस्कृत भाषेत संभाषण करु शकता. सदर शिबिर पूर्णतः विनामूल्य असून अस्खलित संस्कृत बोलणारे अनुभवी शिक्षक आय.टी. इंजिनियर गोविंद कासुल पुणे हे मार्गदर्शन
करणार आहेत.
[ असे होणार शिबिर ] सकाळी ८ ते १० गणेशनगर येथील गणेश मंदिर आदर्श शाळे जवळ होईल. बाजारपेठ, विठ्ठल मंदिर, कासट मंगल कार्यालय, कॅप्टन लक्ष्मी चौक या ठिकाणी संध्याकाळी – 6 ते 8 या वेळेत होणार हे शिबिर होणार आहे
9146512829,
8888072588,
8830313849
9960252531
इच्छुकांनी येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
