मातोश्री लक्ष्मी  देव्हारे यांच्या स्मृती आधार स्मृतीवृक्ष रोपण
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
मातोश्री लक्ष्मी  देव्हारे यांच्या स्मृती आधार स्मृतीवृक्ष रोपण करून जपल्या जाणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते, आधारचे शिलेदार, माजी मुख्याध्यापक के एस देव्हारे सर यांच्या सौभाग्यवती स्व. लक्ष्मी कारभारी देव्हारे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
    आधार फाउंडेशन संगमनेर ही संस्था आधार सदस्याच्या घरातील अशा दुःखाच्या प्रसंगी एक केशर आंब्याचे  स्मृतीवृक्ष देऊन ते झाड जगवून आवडत्या व्यक्तीची स्मृती ज्वलंत ठेवण्याची विनंती करते.तसेच अंत्यविधीनंतर तयार होणारी रक्षा नदीत वा तलावात न टाकता वृक्षारोपणासाठी घेतलेल्या खड्ड्यात ही रक्षा टाकून स्मृतिवृक्षाचे रोपण करण्यात येते.आधारने आजपर्यँत १४१  केशर वृक्षांचे रोपण केले आहे.
   आधार परिवारातील सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, रामदास सोनवणे, विठ्ठल कडुसकर, अनिल कडलग, रामनाथ सातपुते साहेब यांनी देव्हारे परिवाराला स्मृतीवृक्ष भेट दिला.
    देव्हारे परिवाराने स्मृतीवृक्ष सोबत आणखी पाच आंब्याची झाडे चिंचपूर येथील मातोश्री लक्ष्मी देव्हारे यांच्या माहेरी आपले भाऊ रामनाथ व भाऊसाहेब सातपुते यांच्या शेतात वृक्षारोपण केले. सोबत आपल्या मातोश्रींची रक्षा झांडाना टाकत शेतातच विसर्जित करण्याचा पर्यावरण पूरक निर्णय घेतला.
       यावेळी सामाजिक कार्यकर्ते कारभारी देव्हारे, विजय देव्हारे, तनेश देव्हारे, भाऊसाहेब सातपुते, रामनाथ सातपुते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!