सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केली पालखी सुरक्षा मार्गाची पाहणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या टीमने अहदनगर जिल्हातील संगमनेर तालक्यात 26जुन रोजी श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीने तालुक्यातील पालखी मार्गची आज पारेगाव बुद्रुक,काकडवाडी,तळेगाव दिघे याठिकाणी पाहणी करत उपाययोजना संदर्भातचा आढावा घेतला.काकड वाडी फाटा याठिकाणी पालखी मार्गाची पाहणी करतेवेळी रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप,पोलीस नाईक राजेंद्र घोलप,पोलीस मित्र सुदाम घोलप, पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले,पोलीस नाईक संतोष फड,पोलीस शांताराम मालूंजकर हजर होते.
