*कै. बंडू रेवबा मरभळ (जवळेबाळेश्वर – कौटेवाडी)*
पठारभागाच्या राजकारणातील व समाजकारणातील नेतृत्व काळाच्या पडद्याआड
आमचे अत्यंत जवळचे, दिलदार मित्र, जवळेबाळेश्वर (कौटेवाडी) गावचे सुपुत्र *श्री. बंडू रेवबा मरभळ* यांचे दि. 16/10/2025 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्याची बातमी ऐकून मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विश्वासच बसत नाही.
बंडूभाऊ हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर एक *अष्टपैलू व्यक्तिमत्व* होते.
*सामाजिक व राजकीय कार्य:*
जवळेबाळेश्वर गावचे माजी सरपंच म्हणून त्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र धडपड केली. राजकारणाची त्यांना प्रचंड आवड होती. राजकीय, सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक व क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचा वावर होता.
ते स्व. माजी आदिवासी विकास मंत्री *मधुकररावजी पिचड साहेब*, मा. आमदार *बाळासाहेब थोरात साहेब*, मा. आमदार *डॉ. सुधीरजी तांबे साहेब* आणि सध्याचे अकोले मतदार संघाचे लोकप्रिय आमदार *डॉ. किरणजी लहामटे साहेब* यांचे एक निष्ठावान आणि विश्वासू कार्यकर्ते होते.
*एक कलावंत आणि खेळाडू:*
स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनाने दिलदार आणि दातृत्व असलेले बंडूभाऊ उत्तम राजकिय वक्ता, उत्तम कुस्तीपट्टू व क्रिकेटपट्टू होते, तसेच उत्तम भजनी आणि तमाशा कलावंत म्हणूनही त्यांची ओळख होती. गावातील प्रत्येक सुख-दुःखात ते हिरीरीने सहभागी व्हायचे.
सध्या ते मुंबई येथे मुंबई महानगरपालिकेत नोकरीस होते, पण त्यांचे मन नेहमी गावात, माणसांमध्ये गुंतलेले असायचे.
त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या पत्नी, आई, दोन मुलं, तीन बहिणी, भाचे आणि समस्त मरभळ परिवारावर तसेच जवळेबाळेश्वर गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या अतिशय कठीण दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
बंडूभाऊंच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*माझ्या दिलदार मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली!*
ॐ शांती…
शोकाकुल महादू गोंधे कोळवाडे
