जवळे कडलग येथील चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला…
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा बळी.
संगमनेर / संजय गोपाळे
संगमनेर तालुक्यातील ( चिखली रोड ) जवळे कडलग गावातील रस्त्यालगत असलेल्या सुरज दिलीप कडलग यांच्या वस्तीवर ( शनिवार दिनांक १३) संध्याकाळी सहाच्या सुमारास घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने
एक ४ वर्षाच्या चिमुरड्यावर जीवघेणा हल्ला करून बळी घेतल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.
जवळेकडला गावातील ग्रामस्थ व नातेवाईक व प्रचंड संतप्त झाले आहे., जोपर्यंत हा नरभक्षक बिबट्याला पकडला जात नाही किंवा ठार केला जात नाही, तोपर्यंत या चिमुरड्याचा नातेवाईक ताब्यात घेणार नाहीं. त्यामुळे तणावाचे वातावरण तयार झाले अहे.
शनिवारी सायंकाळच्या ६ वाजेच्या सुमारास सुरज कडलक यांच्या गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या अंगणात खेळत असताना घरा शेजारील गिनी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सिद्धेशला जागेवरच ठार केले. यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आरडावरडा केला.
परंतु याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी बिबट्याने चार वर्षीय चिमुरड्याचा बळी घेतला.
या घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपविभागीय वनाधिकारी अमरजीत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. मात्र, संतप्त झालेले नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
