पत्रकार नवनाथ वावरे यांची मालपाणी उद्योग समूह सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी एकमताने निवड
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मालपाणी उद्योग समूह सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी पत्रकार नवनाथ वावरे यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमन पदी भारत घोडेकर यांची एकमताने निवड झाली आहे. अशी सुचना संघटनेचे अध्यक्ष काॅ माधवराव नेहे यांनी मांडली असता सर्व संचालक मंडळाने टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.
नवनाथ वावरे सध्या महासत्ता वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. मालपाणी उद्योग समूहात प्रोसेस विभागात गली पंधरा वर्षांपासून काम करत असताना कामगार चळवळीत सहभागी होऊन कामगारांची बाजु मांडत असतात.
संगमनेर तालुक्यातील तंबाखू कामगार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.
तंबाखू कामगार संघटनेचे अध्यक्ष काॅ. माधव नेहे,काॅ. ॲड ज्ञानदेव सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे मावळते चेअरमन चंद्रकांत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक कामगार युनियन कार्यालयात पार पडली.
प्रास्ताविक करताना काॅ माधवराव नेहे यांनी ४७ वर्षं संस्थेची बिनविरोध पंरपरा आजवर जोपासली आहे, यापुढेही अशीच वाटचाल सुरू रहावी यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले.
संस्थेचे माजी चेअरमन चंद्रकांत आव्हाड,व्हा चेअरमन उमेश सोनसळे, संचालक बाळु राऊत, मुकेश काठे,बालाजी हजारे, नाना पोकळे, सौ नंदा पवार, संस्थेचे सेक्रेटरी भानुदास कानवडे, विजय डुबे आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
