मालपाणी उद्योग समूह सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी नवनाथ वावरे तर व्हा चेअरमन पदी बाळु राऊत
_नवनिर्वाचितांचे अभिनंदन, शुभेच्छा सत्कार समारंभ संपन्न_
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मालपाणी उद्योग समूह सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन निवडी तंबाखू कामगार युनियन संघटनेचे अध्यक्ष काॅ माधवराव नेहे व संघटनेचे सरचिटणीस ॲड ज्ञानदेव सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात ६ सप्टेंबर रोजी पार पडल्या, चेअरमन पदी नवनाथ वावरे तर व्हा चेअरमन पदी बाळु राऊत यांच्या नावाची घोषणा काॅ माधवराव नेहे यांनी केली, उपस्थित संचालक मंडळाने टाळ्या वाजवून अनुमोदन देत स्वागत केले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन मालपाणी इंडस्ट्रीयल पार्क या ठिकाणी श्रावणी चौथ्या सोमवार चे औचित्य साधत आयोजन करण्यात आले, उद्योग समुहाचे व्यवस्थापक रमेश घोलप, प्रोसेस विभागाचे एच ओ डी देवदत्त सोमवंशी, एच आर प्रमुख रविंद्र कानडे, राहुल शेरमाळे, विशाल वाजपेयी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. अभिनंदन व सत्कार सुचना काॅ माधवराव नेहे यांनी मांडली.
संस्थेचे मा चेअरमन चंद्रकांत आव्हाड, मा व्हा चेअरमन उमेश सोनसळे, संचालक मुकेश काठे, संतोष पोकळे, बालाजी हजारे, भारत घोडेकर, सौ नंदा पवार, सौ जयश्री चौधरी, सौ. रंजना जगताप, सेक्रेटरी भानुदास कानवडे, विजय डुबे यासंह संस्थेचे सभासद, कामगार, युनियन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
