छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसस्थानक परिसरातच व्हावा असा प्रयत्न-  सौ.दुर्गाताई तांबे यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी आ.सत्यजित तांबे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शहाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेरच्या ऐतिहासिक भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आ. सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून हा अश्वारूढ पुतळा व भव्य दिव्य शहीद स्मारक संगमनेर बस स्थानकाच्या परिसरात व्हावे यासाठी आ. सत्यजित तांबे यांनी  आग्रही मागणी केली असून या परिसरातच हे स्मारक होण्यासाठी प्रयत्न असल्याची माहिती नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

या स्मारकाबाबत जिल्हाधिकारी व शासनाकडे मागणी करताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर मध्ये व्हावा यासाठी आमदार बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. याचबरोबर संगमनेर बस स्थानक परिसरात हा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी संगमनेर नगरपालिकेने 3 जून 2019 रोजी सर्वसाधारण ठभेमध्ये ठराव देखील केलेला आहे . या स्मारकाबाबत आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला.

मात्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर  आ सत्यजित तांबे यांनी या कामी पाठपुरावा सुरूच ठेवला. याबाबत त्यांनी   मुख्यमंत्र्यांकडे  21 ऑगस्ट  2023 रोजी सदर बस स्थानकावरील एसटी महामंडळाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करावी अशी मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आणि एसटी महामंडळाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.तो प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि कुठल्याही क्षणी ती जागा अश्वरूढ पुतळ्यासाठी संगमनेर नगरपालिकेकडे वर्ग होईल अशी परिस्थिती आहे .

आता नव्याने अहमदनगर  जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांनी शिवस्मारक करण्याच्या बाबत घोषणा केली आहेत. याचे मी स्वागतच करते आहे . संगमनेर मधील छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र बस स्थानकावरच हे स्मारक व्हावे यासाठी सत्यजित तांबे यांनी तातडीने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने जागांची हस्तांतर अंतिम टप्प्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले त्यामुळे महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक संगमनेर बस स्थानकावरच व्हावे असा पाठपुरावा सत्यजित तांबे यांचा सुरू असून या परिसरातच हे स्मारक होण्यासाठी आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे

अश्वारूढ पुतळा व शहीद स्मारक यासाठी  एक कोटीचा हा  निधी पुरेसा नसून किमान दोन कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा आणि एसटी स्टँड परिसरामध्ये व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेव जाधव  शहीद स्मारक करता येईल.

हे स्मारक संगमनेर तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक तसेच स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी संरक्षण देशाच्या संरक्षणासाठी आपली प्राणाची आहुती दिली व स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली अशांच्या स्मरणार्थ व्हीक्टोरिया क्रॉस विजेते नामदेव जाधव यांच्या नावाने शहीद स्मारक करण्याचा देखील प्रस्ताव नगरपालिकेचा आहे .ते दोन्ही कामे वाढीव निधीतून पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी यावा अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करते. त्याबाबतचे पत्र आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले आहे .

 

आ.सत्यजित तांबे यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी सत्यजित तांबे यांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते .यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून एसटी महामंडळाची जागा तातडीने नगरपालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित होणार असून नुकताच जिल्हा नियोजन समितीकडून या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. अश्वारूढ पुतळा व स्मारकासाठी आ सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संगमनेर तालुक्यातील तमाम नागरिकांकडून व शिवप्रेमींकडून विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!