संगमनेर तालुका जुनी पेन्शन संघटना अध्यक्षपदी खेबडे तर सरचिटणीसपदी प्रदीप बागुल यांची निवड
संगमनेर : लोकवेध live न्यूज
महाराष्ट्र राज्य जुनी
पेन्शन संघटना संगमनेर शाखेच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले असून संघटनेच्या अध्यक्षपदी विकास खेबडे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शिवनाथ भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले.
नूतन कार्यकारिणीअध्यक्षपदी विकास खेबडे, सरचिटणीसपदी प्रदीप बागुल, कार्याध्यक्षपदी अक्षय खतोडे तर कोषाध्यक्षपदी दत्ता आंबरे यांची निवड करण्यात आली. महिला अध्यक्षपदी अश्विनी मेहेर, सरचिटणीसपदी ज्योत्स्ना बडे, कार्याध्यक्षपदी ज्योती कदम, कोषाध्यक्षपदी मनीषा दातीर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रविण गाडेकर, सोमनाथ पोंदे, संजय साबळे, अण्णा शिंदे, सिताराम दळवी, निता सावंत,सहकार्याध्यक्ष सचिन गांडोळे, शिवाजी भगत, माधवी राऊत, सुजाता शेटे, सह कोषाध्यक्ष. मारोती पुपलवाड, शितल पांडे व जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत साळवे, रविंद्र भालेराव, प्रदीप उकांडे, विद्या पांडे प्रवक्ते जितेशकुमार लोढा, ज्योती घोटेकर, सोशल मीडियाप्रमुख बाळासाहेब इदे, भाग्यश्री बडदे, तालुकासंपर्क प्रमुख दत्तात्रय तांबे, हरिभाऊ सहाणे, भाऊसाहेब घोडे, अशोक ढोले, रुपाली महामुनी, योगिता गोफणे, प्रसिद्धी प्रमुख गणपत गोडे, सचिन निकम, शितल वेताळ, संघटक शरद गवारी, संजय कानवडे, विक्रांत मते, कांचन जाधव, ज्योती घोडे, उषा भोकनळ, उर्दू माध्यम प्रतिनिधी मतीन मणियार, तनजीला शेख यांची तर नेते शिवाजी आव्हाड, निलेश हारदे, बाबुराव कदम यांची निवड करण्यात आली आहे.
