दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणार – आमदार खताळ
शिरसगाव धुपे आणि सावरचोळ मेंगाळवाडी बिरोबा महाराजांचे घेतले दर्शन
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच पावसाचे पाणी जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. या साठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केला
संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या शिरसगाव धुपे आणि सावरचोळ मेंगाळवाडी येथील बिरोबा महाराज यात्रा उत्सव निमित्त आमदार अमोल खताळ पाटील यांनी बिरोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की दुष्काळाच्या परिस्थितीत शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच ज्या ठिकाणी तातडीने मदतीची आवश्यकता असेल, तेथे वैयक्तिक पातळीवरही मदत करण्या साठी आपण पुढाकार घेणार आहोत आपल्याला आमदारकी ही आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने मिळालेली आहे तिचा उपयोग या तालुक्यातील माय बाप जनतेच्या हितासाठीच करणार असल्याचे आमदार खताळ पाटील यांनी सांगितले
संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे हा परिसर आजपर्यंत विकासा च्या बाबतीत दुर्लक्षित राहिल्याची भावना ग्रामस्थांमध्ये होती. मात्र, आता तुम्ही सर्वजण शिवसेनेत सहभागी झाले आहे त्यामुळे या भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले
शिरसगाव धुपे आणि सावरचोळ येथील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
चौकट
बिरोबा मंदिरासमोर ओट्याचे बांधकाम पूर्ण
संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम शिरसगाव धुपे येथील बिरोबा महाराज मंदिरासमोर ओटा बांधण्याची ग्रामस्थांची मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी तत्काळ मान्य करत स्वखर्चातून या ओट्याचे . यात्रेपूर्वीच बांधकाम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी आमदार खताळ यांचे आभार मानले.
पुढील वर्षी सभामंडपात कार्यक्रम घेण्याचा संकल्प
शिरसगाव धुपे या गावात धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात अशीअपेक्षा व्यक्त करत आमदार खताळ यांनी यावर्षी तुमच्या यात्रेचा कार्यक्रम मंडपात झाला परंतु पुढील वर्षी हा कार्यक्रम सभामंडपात होईल या दृष्टीने काम करून वर्षभरात सभामंडप पूर्ण केला जाईल असेही आमदार अमोल खताळ पाटील यांनी सांगितले
सावरचोळ मेंगाळवाडी बिरोबा देवस्थान ब वर्ग दर्जासाठी प्रयत्न करणार
संगमनेर तालुक्यातील सावरचोळ मेंगाळवाडी येथील बिरोबा महाराज मंदिराला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून क वर्ग दर्जा मिळाला आहे मात्र भविष्यात या देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करा मी शासन दरबारी यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास आमदार अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केला
