पोलीस निरीक्षक भगवानची मथुरे साहेबांच्या राज्यात संगमनेर मध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट : संगमनेरातील निष्क्रिय व लाचखोर पोलीस यंत्रणेचा चेहरा जनतेसमोर ; अमर कतारी

संगमनेरातील मटका,जुगार, गुटखा विक्री अवैध धंद्यां विरोधात अखेर नाशिक येथील महानिरीक्षक कार्यालयात निवेदन

संगमनेर / लोकवेध live न्यूज

संगमनेर शहर व परिसरात पत्त्याचा क्लब, जुगार मटका व मटक्याचा क्लब, गांजा असे अनेक अवैध धंदे राजरोस सुरु असून काही ढाबे व हॉटेल मधेही बेकायदेशीर दारूविक्री करण्यात येते. तसेच काही बार चालक व दारू दुकान यांना शासकीय वेळेत दारू विकन्याची परवानगी असताना देखील रात्री बारा ते एक वाजेपर्यंत सदर बियर बार मध्ये बेकायदेशीर रित्या दारू विक्री चालू असते. पूर्वी संगमनेर मध्ये मटक्याच्या मुख्य पेढी होत्या व त्यामार्फत 60 ते 70 ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू होता आता या मटका पेढीला तिसरा व्यक्ती आलेला आहे तरी या तिन्ही मटका पेढी चालक मालक यांच्यावर कारवाई करावी तसेच मटक्या मुळे संगमनेर मध्ये अनेक वाद होत आहे या मटका पिढी चालक यांच्यातील वादाचा परिणाम संगमनेर शहरातील शांतता व सुव्यवस्था खराब होण्याचे एकमेव कारण आहे तसेच या मटका चालकामुळे संगमनेर मध्ये हिंदू मुस्लिम वाद होऊन दंगल होऊ शकते हे धंदे व जुगाराच्या पेढ्या,क्लबवर तातडीने कारवाई करावी ह्या संदर्भात संगमनेर मधील शिवसैनिक व जिल्हा दारुबंदी कृती समितीचे अध्यक्ष अमर कतारी यांनी पाठपुरावा केला होता तसेच शहर पोलीस स्टेशनला वारंवार निवेदन करून सुचित केले होते हे धंदे कोण चालवते हे पोलिसांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना देखील माहिती असून पोलीस खात्यातील काही भ्रष्ट कर्मचारी आर्थिक संबंध जपत कर्तव्य टाळत असल्याने हे धंदे खुलेआम सुरु आहेत हे देखिल कतारी यांनी वरिष्ठ पोलिसांना कळवले होते . संगमनेर शहरात कुठलाही अधिकारी नव्याने बदली होऊन आला की सुरुवातीला काही दिवस हे अवैध धंदे बंद केले जातात व नंतर अधिकाऱ्यांच्या नावावर हफ्ता गोळा केला जातो संबंधित स्थानिक अधिकारी पोलीस निरीक्षक व वरिष्ठ यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही.परंतु भ्रष्ट व दोषी कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांकडून ऑनलाइन पैसे घेतल्याचे स्क्रीनशॉट थेट विभागीय पोलीस कार्यालय नाशिक व लाचलुचपत विभागाला देण्यात आले.
अमर कतारी यांनी सांगितले कि 5मार्च च्या आत हे सर्व धंदे बंद करावे हे धंदे बंद न झाल्यास पोलीस प्रशासनाला जाग आनण्यासाठी आय.जी.ऑफिस नाशिक येथे आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा अर्ज मी 01 मार्च 2024 रोजी दिला होता व त्या अर्जामध्ये 5 मार्च 2024 पर्यंत अवैध मटका व्यवसाय बंद करणे बाबत निवेदन दिले होते त्या निवेदनाला उत्तर म्हणून संगमनेरचे पोलीस निरीक्षक भगवानजी मथुरे यांनी 7 मार्च 2024 रोजी लेखी स्वरुपात लिहून दिले व घेतले की संगमनेर मधील अवैध मटका व्यवसाय त्वरित बंद करतो आपण पुढील आंदोलन करू नये सदर जबाब लिहून दिल्यानंतर देखील एकही मटका व्यवसाय बंद नाही उलट खुलेआम जोमाने मटका व्यवसाय सुरू आहे आज 11 मार्च 2024 एकही अवैध मटका व्यवसाय बंद नाही म्हणून आपण सदर अवैध धंदे व्यवसाय बंद करण्या बाबत व दोषी पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करणेबाबत नाशिक येथील आयजी (महानिरीक्षक) कार्यालय येथे जाऊन निवेदन दिले असून आयजी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत करवाई बाबत सूचना केल्या असून सदरील निवेदन मेलद्वारे नगर ऐसपी ऑफिस तसेच लाचलुचपत विभाग यांना देण्यास सांगितल्याचे अमर कतारी यांनी सांगितले. तसेच चार दिवसात अवैध मटका जुगार बंद न झाल्यास कोणत्याही क्षणी संगमनेर नाशिक पुणे हायवेवर रास्ता रोको करण्याचे देखील याप्रसंगी शिवसेना संगमनेर शहर, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे वाहतूक सेनेचे इम्तियाज शेख युवा सेना माजी तालुकाप्रमुख राजू सातपुते युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद शाखाप्रमुख अल्ताफ शेख व दारुबंदी कृती समिती नगर जिल्हा सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!