बेकायदेशीर गौणखनिज वाहतुकीने अंभोरे ग्रामस्थ संतप्त, ढंपर आडववुन केली कान उघडनी
ढंपर मालकला राजकीय वलय असल्याने दहशत निर्माण करणारा असल्याने कारवाई साठी होतेय टाळाटाळ
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 अंभोरे मार्गे जोर्वे गावाच्या दिशेने बेकायदेशीर पोयटा माती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत, अवजड असलेले वाहन ढंपर मधुन माती वाहतूक गेली पंधरा ते वीस दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे, ही अवजड वाहने गावठाण हद्दीतुन भरधाव वेगाने चालवली जातात यामुळे गावातील लोकांना हकनाक त्रास होत आहे, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे गावात धुळीचे साम्राज्य पसरले आहे, घरात, दुकानात, शेतीमालावर, जनावरांच्या चाऱ्यावर धुळीचे लोट येत आहेत यामुळे अंभोरे सह रस्त्याच्या कडेचे गाव, लोकवस्ती चे जनजीवन विस्कळित झाले आहे.
संतप्त झालेल्या अंभोरे ग्रामस्थांनी आज सकाळी हे ढंपर आढवुन चौकशी केली असता हे सर्व बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे आढळून आले आहे, वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल वाहत आहेत, या संबंधी ग्रामस्थांनी राॅयल्टी सह इतर कागदपत्रांची मागणी केली असता वाहन चालकानी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत, संबंधित वाहतूक करणाऱ्या मालकाचे नाव विचारले असता मोठं राजकीय वलय असलेला राजकीय नेता आहे, यामुळे महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करताना कुचराई करीत आहेत अशी चर्चा ग्रामस्थांमधून सुरू झाली आहे.
याच परिसरातून या ढंपर मालकाने मोठ्या प्रमाणात मुरुम,पोयटा माती वाहतूक केल्याचे आज बोललं जात आहे, अती अवजड वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल वाहतूक होत असल्याने या परिसरातील रस्ते खचले आहे, खड्डे पडले आहेत हा हकनाक त्रास ग्रामस्थांनी कुठपर्यंत सहन करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे, सदर ढंपर मालकाचे राजकीय वलय असल्याने मोठी दहशत आहे , या ढंपर मालकाच्या विरोधात ग्रामस्थ तक्रार करत नाही, आणि महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा कारवाई करण्यास पुढे येत नाही असे आरोप काही सुज्ञ नागरिकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!