संगमनेर शहर व तालुका हद्दीतील अवैध धंदे ,दारू, मटका, जुगार क्लब, गांजा त्वरित बंद करावा अन्यथा आय जी कार्यालय नासिक समोर आंदोलन – अमर कतारी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शहर व तालुका हद्दीतील अवैध धंदे ,दारू, मटका, जुगार क्लब, गांजा त्वरित बंद करावा अन्यथा आय जी कार्यालय नासिक समोर आंदोलन करण्याचा इशारा,, अमर कतारी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समिती
दारूबंदी कृती समितीचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेना मा शहरप्रमुख अमर कतारी यांच्यावतीने संगमनेर पोलीस निरीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संगमनेर शहर व तालुका हद्दीतील अवैध धंदे बंद करणे बाबत निवेदन देण्यात आले
सदर निवेदनात माननीय महोदय,
मी अमर कतारी, महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने निवेदनाद्वारे आपणास सुचित करू इच्छितो संगमनेर शहर व परिसरात पत्त्याचा क्लब, जुगार मटका व मटक्याचा क्लब, गांजा असे अनेक अवैध धंदे राजरोस सुरु असून काही ढाबे व हॉटेल मधेही बेकायदेशीर दारूविक्री करण्यात येते. तसेच काही बार चालक व दारू दुकान यांना शासकीय वेळेत दारू विकन्याची परवानगी असताना देखील रात्री बारा ते एक वाजेपर्यंत सदर बियर बार मध्ये बेकायदेशीर रित्या दारू विक्री चालू असते. पूर्वी संगमनेर मध्ये मटक्याच्या मुख्य पेढे होत्या व त्यामार्फत 60 ते 70 ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू होता आता या मटका पेढीला तिसरा व्यक्ती आलेला आहे तरी या तिन्ही मटका पेढी चालक मालक यांच्यावर कारवाई करून यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करावे, या मटका चालत मुळे संगमनेर मध्ये अनेक वाद होत आहे या मटका पिढी चालक यांच्यातील वादाचा परिणाम संगमनेर शहरातील शांतता व सुव्यवस्था खराब होण्याचे एकमेव कारण आहे तसेच या मटका चालकामुळे संगमनेर मध्ये हिंदू मुस्लिम वाद होऊन दंगल होऊ शकते हे धंदे व जुगाराच्या पेढ्या,क्लब कुठे आहेत, कोण चालवते हे पोलिसांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना देखील माहिती आहे मात्र पोलीस खात्यातील काही भ्रष्ट कर्मचारी आर्थिक संबंध जपत कर्तव्य टाळत असल्याने हे धंदे खुलेआम सुरु आहेत. संगमनेर शहरात कुठलाही अधिकारी नव्याने बदली होऊन आला की सुरुवातीला काही दिवस हे अवैध धंदे बंद केले जातात व नंतर अधिकाऱ्यांच्या नावावर हफ्ता गोळा केला जातो संबंधित स्थानिक अधिकारी पोलीस निरीक्षक व वरिष्ठ यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही.परंतु भ्रष्ट व दोषी कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांकडून ऑनलाइन पैसे घेतल्याचे स्क्रीनशॉट थेट विभागीय पोलीस कार्यालय नाशिक व लाचलुचपत विभागाला देण्यात येणार आहे म्हणूनच 5मार्च च्या आत हे सर्व धंदे बंद करावे हे धंदे बंद न झाल्यास पोलीस प्रशासनाला जाग आनण्यासाठी आय.जी.ऑफिस नाशिक येथे आंदोलन करण्यात येईल. तरी सदरील गंभीर प्रकरणाचा आपण तातडीने विचार करत कार्यवाही करावी. अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर माझी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे दारूबंदी कृती समिती तालुकाप्रमुख रंगनाथ फटांगरे युवा सेनेचे अमोल डुकरे योगेश खेमनर संघटक राजू सातपुते उपतालुकाप्रमुख संतोष कुटे अमित फटांगरे इम्तियाज शेख फैसल सय्यद रहीम बेग भीमा अनाप मुकेश काठे अक्षय बिल्लाडे अक्षय गाडे प्रकाश चोथवे प्रशांत खजुरे वेनूगोपाल लाहोटी दीपक जी साळुंखे लक्ष्मण सोनर जना नागरे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शितल हासे संगीता गायकवाड आशा केदारी रेणुका शिंदे युवा सेनेचे वैभव अभंग जयदेव यादव अनिल खुळे पंकज पडवळ सागर भागवत संभव लोढा ब्रह्मा खिडके आधी शिवसैनिकांच्या सह्या आहेत
