उत्कर्षाताई रुपवतेंच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकर श्रीरामपुरात !

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी 4 मे रोजी मिनी स्टेडियम, कोर्ट रोड, श्रीरामपूर येथे दुपारी 12 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!