ओबीसी उमेदवार देण्यासाठी विचार मंथन
अहिल्यानगर / लोकवेध live न्यूज
ओबीसी बांधव, अठरापगड जाती व बारा बलुतेदार यांची लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय अहिल्या नगर (नगर)ओबीसी, अनुसुचित जाती जमाती, भटक्या विमुक्त,अल्पसंख्याक समाजातील बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .बैठकीत लोकसभा उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली.प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.सर्वानी मिळुन एकाच ओबीसी उमेदवाराचे काम करण्याचे ठरविले आहे .प्रस्थापिताच्या विरोधात मुठ बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र येत ओबीसी अस्तित्व दाखवण्यासाठी एकी करण्याचे एकमताने ठरविले गेले. ही निवडणूक सर्व सामान्य मतदारांनी हातात घेतली आहे.त्यामुळे ओबीसी, अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त अल्पसंख्याक प्रस्थापित सोडुन ही निवडणूक पार पडणार आहे .७७ वर्षांनी या समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे .त्यामुळे एकाच उमेदवारीवर लवकरच शिक्का मोर्तब करून प्रचार यंत्रणेत रंगत येणार आहे . काही बांधव काही पक्षाला बांधले गेल्यामुळे प्रश्न निर्माण होत आहे परंतु काहींनी सदर पक्षाचा राजीनामा देत खुले आव्हान स्वीकारले आहे. भविष्यात आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून ओबीसी बांधवांनी पुढे यावे . सदर घटनेवर विचार मंथन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी दिलीप खेडकर ,सुधाकरराव आव्हाड, पै पानसरे छबनराव,नईन शेक, साहेबराव रासकर, इंगळे सुनीता,सुनील भिंगारे, रमेश सानप, मंगल भुजबळ, सुधाकर शेलार ,चंद्रकांत पुंड आदींनी विशेष पूर्ण घटकावर चर्चा केली. सुधाकर आव्हाड व दिलीप खेडकर हे वरिष्ठ नेतेमंडळाचे संपर्कात असून महादेव जानकर यांनी ओबीसी उमेदवाराला उमेदवारी का नाही दिली तसेच भाजपने सुद्धा ओबीसी उमेदवार टाळलं हे असं का? सदर घटनेवर खूप मोठी चर्चा केली.पैलवान पानसरे सर्वांनी सर्वची मने जिंकली. काही ओबीसी उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आपलंच घोड दामटत आहेत .परंतु ते ओबीसीच्या मिटींगला उपस्थित नसतात अथवा त्यांचं ओबीसी बांधवांना नाव सुद्धा माहित नाही व स्वतःहूनच उमेदवारी जाहीर करतात याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. ओबीसी उमेदवारांनी या अगोदर पारनेर नंतर सारस नगर अहिल्यानगर , पाथर्डी नंतर लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय आशा मीटिंग घेत सर्वांशी चर्चा केलेली आहे . महादेव जानकर यांनी दिलेली उमेदवार ही त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु चर्चेनंतर ते त्या ठिकाणी निघून गेले. तसेच ओबीसी उमेदवार नसेल तर त्यांना आम्ही बिलकुल मतदान करणार नाही असे धनगर समाजाने आव्हान व्यक्त केले.आता उमेदवार निश्चित होत आहे. यावेळी पैलवान पानसरे छगनराव यांनी अनेक दिवसापासून केलेली तयारी सांगून सर्वसामान्य जनतेच्या जनसंपर्कात त्यांच्या विचारातून मुळापाट पाणी कृती समितीवर भर देत तसेच शेवगाव ,पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा ,पारनेर या भागाचा अजूनही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही? त्यासाठी माझ्याकडे पूर्ण आराखडा आहे. नगर जिल्ह्याचे पाणी थेट नादेडपर्यंत दिले जाते. पण आम्हाला का दिले जात नाही? या संदर्भात शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. तसेच सर्वांना आव्हान केले प्रत्येक ओबीसी उमेदवारांनी उमेदवारी करावी टायमाला जो सर्वांच्या संपर्कात राहील त्याची उमेदवारी डिक्लेअर केली जाईल. व एक आणि एकच उमेदवार दिला जाईल त्यावेळेस सर्वांनी त्यांना सपोर्ट करावा व तो उमेदवार निवडून आणावा. तसेच त्यांची उमेदवारी सर्वात अगोदर डिक्लेअर झालेली आहे पण मी सर्वांचे विचार ऐकून घेऊन उमेदवारी करणार !आपले कार्य त्यांनी सांगू सर्वांची मने जिंकली.कार्यक्रम संपल्यानंतरही महत्त्वाचे कार्यकर्ते घेऊन ऊन विचार मंथन करण्यात आले. आलेल्या संधीचं सोनं करा असे आव्हान करत पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यात आली.
