माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंची कोणतीच चालणार नाही ट्रिक ; खासदार सदाशिवराव लोखंडेची होणार नाही हॅट्रिक :- उत्कर्षा रूपवते
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
सर्वच ठिकाणी जल्लोष आणि टाळ्याच्या गजरात माझे स्वागत झाले. हीच माझ्यासाठी प्रेरणा होती इथल्या मातीतला उमेदवार या मतदार संघाला मिळाला असल्याने मताची ओवाळणी ही त्याच पद्धतीने होईल असा आत्मविश्वास शिर्डी मतदार संघाच्या उमेदवार
उत्कर्षा रूपवते यांनी प्रचाराची सांगता समारोह प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी सोबत जन आहे आणि म्हणूनच ते एक परफेक्ट व्हिजन आहे. याच परफेक्ट नियोजनाने विरोधकांचा
करेक्टकरू कार्यक्रम करून ते पिपाणी वाजवत बसणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या मतदार संघात तळागाळातील प्रत्येक समुदायाचा जाहीर पाठिंबा मला मिळत गेल्याने आपले बळ अधिकच बळकट होत आहे. आता ही ठिणगी वनवा पेटल्याशिवाय व प्रतिस्पर्ध्याला गारद केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आम्ही असे अनेक दगडफेकीचे पोस्टरफाडीचे षडयंत्र नक्की हाणून पाडू. असे कितीही दगड मारले तरी “या मतदारसंघाचा गड” आम्ही शाबूत आणि काबूत ठेवणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या मतदार संघांमध्ये अनेकांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचेही दिसून आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कारण जे लोकांचे प्रश्न मांडू शकत नाही, सोडवू शकत नाही त्यांना निवडून देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मला थांबवण्यासाठी मोठ्या ताकतीने प्रयत्न केला गेला आहे. परंतु मी आणखीनच जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता माझ्यासोबत अनुभूती आणि सहानुभूती आहे.
या सहानुभूतीच्या लाटेने
अनेक समुदायाचा जाहीर पाठिंबा तसेच कार्यकर्त्याच्या भेटी ह्या माझ्यासाठी ऊर्जा बनल्या असल्याचे उत्कर्षा रूपवते यांनी सांगितले. एका रणरागिनी समोर बलाढ्य प्रतिस्पर्धी उभे राहतात. ही झाशीची राणी, रमा जिजाऊची लेक आहे. परंतु आज या रणसंग्रामामध्ये महिलेवर दगडफेक होते ही माझी नव्हे तर प्रस्थापित व्यवस्थेची शोकांतिका आहे. “ख्वाब तो काच से नाजूक है, टूटने से इन्हे बचाना है” हे स्वप्न न टुटता ते सत्यात उतरवण्यासाठी ही अग्निदिव्याची ज्वाला पेटवत पुन्हा जोमाने संघटित होणार असल्याचा एक गर्भित इशाराच त्यांनी यावेळी दिला. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची कोणतीही ट्रिक चालू देणार नाही, तर सदाशिवराव लोखंडे यांची हॅट्रिक घेऊ देणार होऊ देणार नसल्याचेही उत्कर्षा रूपवते यांनी ठासून सांगितले. ही निवडणूक एका स्त्री विरूध्द पुरूष प्रधान संस्कृतीची आहे. तीच आमची प्रतिष्ठा आहे. मानवी प्रतिष्ठेची बुज राखणे आमचे कर्तव्य आहे असे म्हणणा-यांना ही चपराक असून. महिला सक्षमीकरणातून
फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राला दिशा देईल. कारण आता अनेक दिग्गजांच्या पाठिंब्याने मतदान व देणगीरूपाने मिळणारा
पैशाचा ओघ हा वाढत व लढत देणारा असणार आहे. विरोधकांचे रीते असलेले खाते, रीतेच राहणार आहे. समान नागरी कायदा पास होईल तेव्हा होईल? एक सक्षम महिला तब्बल 19 पुरूषांच्या विरोधात उभी ठाखली असून ही झाशीची राणी, सावित्री जिजाऊंची लेक आहे. ही ग्यानब्याची मेख परफेक्ट काम करणार असून विरोधकाला लाजवेल असा प्रसार आणि प्रचार जोमाने आणि ध्यैर्याने झाला.
हा प्रचार बघून विरोधक आवाक झाले असून अक्षरशः तोंडात बोट घातलेले आम्ही प्रत्यक्ष बघितले. एकीकडे 42 –
43 डिग्री असलेले तापमान उन्हाचा कडाका तर दुसरीकडे मतांचा आकडा ओढण्याचा आमचा धडाका नक्कीच शिर्डी मतदार संघाची रणनीती बदलणार आहे असे रूपवते म्हणाल्या.
स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षात पूर्वीचा कोपरगाव सध्याचा शिर्डी मतदारसंघात एकही महिला प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघातून महिला खासदार उमेदवारीही दिलेली नाही आणि निवडूनही गेलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदार संघांमध्ये प्रथम उच्चशिक्षित ,तरुण महिलेला संधी देण्यात आली ती संधी सार्थ ठरवणार असल्याचे उत्कर्षा रूपवते यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण सर्व मतदारराजा म्हणून माझ्या ओटीमध्ये सोमवार 13 मे 2024 रोजी उन्हाची , पावसाची दबावाला आमीषाला बी न पडता माझा – अनुक्रमांक 4 उत्कर्षा प्रेमानंद रूपवते – अधिकृत निशाणी प्रेशर कुकरचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे नम्र आवाहन
देखील शिर्डी मतदार संघातील मतदार राजाला त्यांनी केले आहे.
