उत्कर्षा रूपवते यांनी खांडेश्वर मंदिरात नारळ वाढून केला प्रचाराचा शुभारंभ

संगमनेर  / लोकवेध live न्यूज 

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांनी खांडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी व मतदार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला यावेळी त्यांनी सांगितले की विजय आपलाच आहे गेली पंधरा वर्षे जे खासदार निवडून गेले आहेत त्यांनी जनतेसाठी काय केले प्रचारात केवळ त्यांनी किती खोके घेतले कोणी किती तुपाचा घोटाळा केला एवढाच प्रचार चालू आहे जनतेचे प्रश्न न मांडता केवळ वैयक्तिक स्वरूपात टिका चालू आहे सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास केला पाहिजे असेही त्यांनी आपल्या प्रचार सभेत सांगितले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!