स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक हात मदतीचा ; मतदान न करताही कृतीतून उमटविला ठसा 

मातोश्री रू. दा. मालपाणी, सह्याद्री शाळेसह अनेक शाळेचा सहभाग

संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे

विद्यार्थीदशेत असतानाच
विश्वास, शिस्त, कर्तव्य आदि काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्काऊट गाईड चे विद्यार्थ्यांना देशाप्रती लोकशाही आणि मताधिकार यांची जाणीव व्हावी त्याची माहिती व्हावी शासनाच्या सूचनेवरून शालेय स्काऊटच्या
विद्यार्थ्यांना लोकशाही, मताधिकार काय असते व ही यंत्रणा कशी राबवल्या जाते याची माहिती होण्यासाठी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मतदार केंद्रावर जाऊन एक हात मदतीचा देत मतदान न करताही आपल्या
कृतीतून त्यांनी एक अनोखा ठसा उमटविला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान सुरू असून मातोश्री रू. दा. मालपाणी विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 14 मुली 21 मुलांनी
लोकशाहीच्या या उत्सवात
सहभाग घेत शिस्तप्रिय आणि महत्वाची भूमिका निभावली.विद्यार्थ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवात भाग घेत दिव्यांगांना मदत करणे, स्वच्छता राखणे, अधिकाऱ्यांना पाणी देणे ज्येष्ठ मतदारांना मदत करणे,
मतदान नेमके कोणत्या वर्गात आहे असा मोलाचा वाटा उचलत मदतीचा हात देत अनोखे दर्शन घडविले. शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र हापसे तसेच स्काऊट गाईडचे शिक्षक संतोष गोरे, पर्यवेक्षक राजेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक अमोल सस्कर यांचे मोलाचे योगदान लाभले. याशिवाय शहरातील सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालय, सह्याद्री
विद्यालय संगमनेर यांच्यासह
शहर व ग्रामीण भागातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील 252 विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद शिरापूर, निमगाव टेंभी , झोळे , खांडगाव, हिवरगाव पावसा, कोनोली ,अंभोरे, पिंपळनेर, जोर्वे ,कोल्हेवाडी, रहिमपूर, चंदनापुरी, रायतवाडी, देवगाव, संगमनेर खुर्द, कोळवाडा, राजापूर, गुंजाळवाडी, दिगंबर गणेश सराफ विद्यालय संगमनेर,ज्ञानमाता विद्यालय संगमनेर मंगळापुर, चिकणी, कासारा दुमाला, वेल्हाळे, सुकेवाडी, डिग्रस, सावरगाव तळ, धांदरफळ खु , वडगाव पान मालदाड आदि गावातील विद्यार्थ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेत आपल्या मदतीतून एकूणच आपल्या राष्ट्र उभारणीला हातभार लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!