नागरिक म्हणतात मतदानाला जाण्याची इच्छाच नाही ; कामचुकार कर्मचारी आणि जनतेच्या सेवकांवर व्यक्त केली नाराजी ;रात्रीत खेळ झाला का ? तर्क विर्तकांना आला ऊत
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
अन्न, वस्त्र, निवारा यासोबत मूलभूत गरजा तसेच वीज पाणी आदिपासून कोणताही घटक वंचित राहू नये किंबहुना त्या घटकाला त्या त्या सुविधेचा लाभ मिळणार नसेल तर आमचे मत काय कामाचे ? असा परखड सवाल करत “खरंच आता मतदानाला जाण्याची इच्छाच राहिली नसल्याची भावना
नाराजी व्यक्त करीत येथील अनेक नागरिकांनी स्पष्टच बोलून दाखवले. राष्ट्र उभारणीत सर्वसामान्य मतदारांचा मोलाचा सहभाग असून प्रत्येक व्यक्तींच्या मतांवर हे राष्ट्र सक्षम उभे आहे, राहणार आहे. परंतु अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मूलभूत गरजा त्यामध्ये वीज ,पाणी, रस्ते पूल अशा अनेक सुविधा देणे हे येथील लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सेवकांचे काम आहे. केंद्र शासन, राज्यशासनाच्या माध्यमातून अनेक विभागामार्फत मग ती पंचायत समिती असेल महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत असेल वीज महामंडळ किंवा परिवहन खाते असेल अथवा बँकिंग सेवा असतील अशा अनेक ठिकाणी नागरिकांची चांगलीच कुचंबना होत असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महागाईमुळे मेटाकुटीला आलेली ही जनता व भरमसाठ वाढत चाललेली बेरोजगारी तुटपुंज्या आमदानीवर दिवसभर राब राबवून कधी तरी
दुपारची उसंत मिळेल, रात्रीची निवांत झोप घेता येईल असे मनाशी ठरूनही तसे होत नाही. 42 ते 43 डिग्री सेल्सिअसचे वाढलेले तापमान, असह्य झालेला उकाडा आणि त्यातच संगमनेर मधील काही भागात कैक तासांचा विजेचा खंडित झालेला पुरवठा हा अनेक नागरिकांना एक प्रकारचा शॉकच ठरला आहे. या घटनेने अख्खी रात्र अनेक नागरिकांनी जागवून काढत नाराजी व्यक्त करत मतदानाला जायचे का नाही ? असा प्रतिप्रश्न या व्यवस्थेला विचारण्याआधी स्वतः:लाच विचारण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त केली. आणि हीच खरी शोकांतिका आहे. ज्या मतदानाच्या भरोशावर आपण सर्वजण राष्ट्र उभारणार आहोत, सक्षम करणार आहोत. 13 मे च्या मध्यरात्रीला रात्री दीड वाजल्यापासून ते सकाळी पावणे सात वाजेपर्यंत तब्बल पाच तासांची वीज खंडित झाल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. त्यातच मोठ्या प्रमाणात
डासांचा वाढलेला प्रादुर्भाव व हवेची झुळूक याचीही प्रचंड उणीव जाणवली. ज्येष्ठ नागरिक ,लहान बालकांना याचा खूपच त्रास झाला. नागरिकांच्या मनात असंतोष पसरला व नाराजी व्यक्त करीत आता मतदान करण्याची इच्छाच राहिली नसल्याची भावना नागरिकासह तरूणांनीही
डासांच्या उपद्रव्याने मानसिक त्रास
शारीरिक त्रास झाल्याने नाराजी व्यक्त केली. दर एकीकडे मात्र विजेचा लपंडाव सोशावा लागतो
तर दुसरीकडे बिल वसुली मात्र जाेरात असते.
लोकशाहीच्या उत्सवात पूर्व रात्रीला नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली. राजकारणाचा खेळ खंडोबा आणि विजेचा असाच खेळखंडोबा सुरू राहिला, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणारच आहे. एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरात अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरने शहरात वीज पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी हाेत आहे. तर आज लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांचा निरुत्साह दिसून येईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत वीज वितरण विभागाकडे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
परंतु पंपिंग स्टेशन येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनी यांच्याकडून विद्युत वाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांपासून विद्युत सप्लाय खंडित झालेला असून तसेच अद्याप पावेतो दुपारी दोन वाजेपर्यंत सप्लाय न आल्यामुळे आणखी एक ते दोन तास सप्लाय येणेस वेळ लागत असल्याचे म. रा. वि. वि. कं. कडून एका संदेशात कळविण्यात आले होते. तसेच सर्व टाकीमध्ये जलसाठा उपलब्ध नसल्याने काल संध्याकाळी होणारा सर्व जलकुंभाचा पाणीपुरवठा होणार नसल्याचेही कळविण्यात आले होते. नागरिकांनी पाणी साठवून, जपून वापरावे व नगरपालिकेस सहकार्य करावे असे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहूल वाघ यांनी सांगितले होते. परंतु रात्री दीड ते सकाळी पावणे सात वाजेपर्यंत वीज पुरवठे बाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही.तसेच तो सुरळीत झाला नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी आश्चर्यही व्यक्त केले.
