कनोली येथील गॉड्स  असेम्बल  मिनिस्ट्रित गॅस आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील गॉड्स  असेम्बल  मिनिस्ट्रि अंतर्गत अध्यक्ष- उज्वला जगताप व रेव्ह.मच्छिन्द्र जगतात यांच्या अध्यक्षतेखाली भारत पेट्रोलियम भारत सरकार, सूर्या गॅस एजन्सी, संगमनेर  आणि दास गॅस सेफ्टी इकअपमेंट  यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
 यावेळी कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी सूर्या गॅस  एजन्सी अधिकारी राकेश गायकवाड,कृष्णा  फटागारे आणि राजू थोरात  हे उपस्थित होते. यावेळी राकेश गायकवाड  यांनी एलपीजी गॅस सिलिंडर व त्याच्या घरगुती वापरामुळे अपघात कसे होतात, याविषयी सर्वाना  मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, की गॅस वापरणे जितके सहज तितकेच त्याच्यापासून अपघात सुद्धा जास्त होऊ शकतात. त्यामुळे गॅस सिलिंडरसोबत खेळ करू नका, कोणत्याही कारणाने गॅस बाहेर आल्यास त्याचा वेग हा २५० पट असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता व त्यामुळे होणारे नुकसान हे अधिक असते.
गॅस सिलिंडरमध्ये एलपीजी वायू हा दोन टक्के आणि हवा ९८ टक्के असते. त्यामुळे रात्री झोपताना रेग्युलेटर बंद करणे आवश्यक आहे. जर रेग्युलेटर बंद केले नाही, तर गॅस हळूहळू लिक होतो. तसेच जर प्रत्येकाने गॅस saftey equpment वापरले तर ते किती फायदेशीर आहे , व तसेच त्या मुळे गॅस गळतीचे जे होणारे परिणाम  आहे ते कशे थांबले जाऊ शकतात याची माहिती दिली. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!