पिंपरणेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार निलेश लंके यांचा विजय जल्लोष साजरा 

 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचा आनंद संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील
कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढे व जिलेबी वाटून आपला आनंद साजरा केला.
यावेळी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर वाकचौरे, राजेंद्र देशमुख,राजहंस दुध संघाचे संचालक रवी रोहम, सरपंच नारायण मरभळ, अजित देशमुख संजय बागुल, गंगाराम वाकचौरे,अजित मांडे अण्णासाहेब राहींज, कल्याण जोर्वेकर,राहुल निकम राहुल बागुल निलेश बागुल,सनी राहिंज, शुभम काळे प्रदीप रकटे, पोपट साळवे,  प्रदीप देशमुख, शामराव देशमुख , बाळासाहेब मांडे, किरण बागुल,
आदी सह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
महाविकास आघाडीला अनुकूल निकाल येताच सर्व कार्यकर्त्यांनी सायंकाळी गावात एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!