आश्वी बुद्रुक येथील वीज मंडळाचा कारभार चालतोय कंत्रांटी कामगारांच्या भरोश्यावर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
अशी बु ,शिबलापुर,उंबरीबाळापुर,शेडगाव परीसरात दि १२जुन रोजी झालेल्या मुसळदार पावसामुळे परीसरातील लाईट २४ तासाहुन अधिक काळ बंद होता. त्यातच आश्वी बु येथील कार्यरत असलेले सरकारी विज कर्मचारी हे कार्यालयीन ठिकाणी राहत नसल्याने ग्रांमस्ताना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आश्वी बु हे गाव राजकीय दृष्ट्या शिर्डी विधानसभा अंतर्गत येते तर सरकारी सर्व कामासाठी आश्वी बुद्रुक ग्रामस्थांना संगमनेर वर अवलंबुन रहावे लागते.
काल झालेल्या वादळी पावसामुळे आश्वी परीसरातील अनेक मोठे झाडे हे जमिनदोस्त झाले.आश्वी बुद्रुक येथील विद्युत पुरवठा हा आश्वी खुर्द येथील सबस्टेशन मधुन केला जातो. सबस्टेशन स्थापने पासुन येथे जुन्या यंत्राद्वारे विद्युत पुरवठा केला जातो यामुळे परीसरात हालक्या स्वरुपाचा पाऊस जरी सुरू झाला तरी येथील विद्युत पुरवठा हा खंडीत केला जातो.अनेकदा हा विद्युत पुरवठा १० ते १२ तासाहुन अधिक बंद केला जातो. आश्वी खुर्द येथे नविन यंत्रेसामुर्गी बसवण्यात यावी अशी मागणी माजी सरपंच हरीभाऊ ताजणे यांनी केली आहे.
आश्वी बु येथे सरकारी तीन कर्मचारी काम करतात यामध्ये लाईनमन सय्यद हे जवळीलच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथुन सवडी नुसार एक दोन दिवस आश्वी बु येथे उपलब्ध असतात. दुसरे कर्मचारी शिंदे हे राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथुन कधी मधी आश्वी बुद्रुक येथे येत असतात तिसऱ्या कर्मचारी ह्या महिला असुन नुकताच त्या प्रस्तुतीच्या रजे नंतर येथे हजर झाल्या आहेत. तसेच आश्वी बुद्रुक येथील कनिष्ठ अभियंता सोनवणे यांच्या बदली नतंर येथील अतिरिक्त कारभार हा आश्वी खुर्द येथील कनिष्ठ अभियंता करण भदाने यांच्याकडे अतिरिक्त म्हणून देण्यात आला आहे.
आश्वी बुद्रुक येथे कायमस्वरूपी विज कर्मचारी देण्याची मागणी आश्वी बु ग्रामपंचायत करत आहे.अनेकदा आवश्यक कागदोपत्राचा पाठपुरवा ग्रामपंचायत मार्फत करण्यात आल्याचा ग्रामपंचायत सदस्य अझर शेख यांनी दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
आश्वी बु परीसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाली की वीज वितरण कंपनी विज पुरवठा खंडीत करते. वरीष्ठ अधिकारी प्रेम पाटील यांच्याकडे कर्मचारी बदली माघितल्यानंतर तो मिळत नाही.तसेच ते माझ्या अंतर्गत कर्मचारी बदली येत नसल्याचे ते सांगतात. मोठा महसूल हा आश्वी परिसरातील मिळत असतानाही सवतीची वागनुक अधिकाऱ्यांकडून मिळत असते.आश्वी बुद्रुकला जर निवासी वायरमन नमिळाल्यास गाव बंद ठेवण्यात येईल.अजय ब्राम्हणेसंचालक प्रवरा सहकारी बँक
