पालखी मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दाखल; चारच दिवसात होणार रस्त्याची डागडुजी.!!

पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केला होता जिल्हाधिकाऱ्यांकडे पालखी रस्ता दुरुस्तीचा पाठपुरावा.!!

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग दुरुस्त करावा यामागणीच्या संदर्भाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता.याचीच तात्काळ अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दखल घेतली.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक हद्दीपासून ते काकडवाडी,तळेगाव-चिंचोली गुरव पर्यंत दुरावस्था झालेल्या श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रस्त्याची पाहणी केली व उपाययोजनासंदर्भात आढावा घेतला.पुढील ४ च दिवसात रस्तायाची डागडुजी करून देणार असल्याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली आहे.याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगरचे कार्यकारी अभियंता शेवाळे,संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे,सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समितीचे उपअभियंता संदेश सातपुते,पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम स्थापत्य विभागाचे सह्याक अभियंता सूरज नाझरकर,पंचायत समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश गुंजाळ,रयत शेतकरी संघटनेचे तालुकाअध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप,काकडवाडी ग्रामपंचायत उपसरपंच जनार्दन कासार,दिलीप शिरसाठ,ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे,सुनील कासार,ज्ञानदेव काळे,केशव शिरसाठ,बाळासाहेब शिरसाठ ग्रामसेविका गांडोळे,बस्तीराम मुळे,प्रकाश तूपसुंदर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.लवकरच हा रस्ता दुरुस्त होणार असल्याने ग्रामस्थांनी देखील आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!