चंदनेश्वर विद्यालयात नवीन विद्यार्थ्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे

चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत प्रवेश घेतलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात व पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
तसेच यावेळी उपमुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल श्री भंडकर सुखदेव व पर्यवेक्षक पदी श्री राहाणे एस.एम सर यांची निवड झाल्याबद्दल प्राचार्य श्री खेमनर अशोक व उपप्राचार्य श्री कैलास राहाणे यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी प्राचार्य श्री अशोक खेमनर यांनी मनोगत व्यक्त करून नवीन आलेला विद्यार्थ्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले
यावेळी पालक, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!