मा. श्री. भा. सं. थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात नवगतांचे स्वागत
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मा. श्री. भा. सं. थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालय कनोली मध्ये इ5 वी ते12 वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. तसेच इ.5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. सिताराम पा. वर्पे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वर्पे, स्था. स्कुल कमिटीचे संचालक नामदेव वर्पे, ग्रा.पं. सदस्य बंडू वर्पे, मा. सरपंच प्रकाश वर्पे, रमेश पारखे, नंदू भागवत वर्पे, दौलत वर्पे, दादा वर्पे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
