फक्त सात मिनिटात दीड लाख रुपयांचे इलेक्ट्रिक सामान चोरले ; साई गगन मोटर रिवायडींग दुकानात धाडसी चोरी
चोरटे सीसीटीव्हीत कैद
दुकानातून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने चोरी केली.
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील नंदू ठोंबरे यांच्या मालकीचे साईगगन इलेक्ट्रिकल्स व मोटर रिवायडींग दुकानचे बंद सेटर चे कुलूप तोडून अनोळखी चोरांनी शटर उचकटून आत प्रवेश केला आतील सामानाची उचका पाचक केली आणि सात मिनिटात दीड लाखाची चोरी केली त्यात महागड्या कॉपर तारा, एक मोबाईल,एक इलेक्ट्रिक मोटर व इलेक्ट्रिक साहित्य ऐवज चोरून नेला ही घटना पिंपरणे या गावांमध्ये सबस्टेशन जवळ असलेल्या साई गगन इलेक्ट्रिकल्स व मोटार रिवायडींग दुकानांमध्ये घडली त्यामुळे पिंपरणे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे
रविवारी पहाटे 5.30 दरम्यान वाजता ही धाडसी चोरी घटना घडली. चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर आहे.
रविवारी पहाटे 5.30 दरम्यान वाजता च्या सुमारास सीसीटीव्ही फुटेज च्या नुसार दोन युवक दुकान कडे येताना दिसले एक संशयित दुकानात शिरला. दुकानातील कॉपर तारा मोबाईल इलेक्ट्रिक मोटर व इलेक्ट्रिक साहित्य ऐवज चोरून नेला जवळपास दीड लाखांच्या वर सामानाची चोरी केली दरम्यान, संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल डी वाय टोपले , पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शेंगाळ आदींनी भेट देत पंचनामा केला
गावात जवळपास दहा पंधरा वेळेस दुकान फोडून चोरी केलेली आहे पोलीस मात्र हातावर हात ठेवून बसले आहेत प्रत्येक वेळेस चोरीचे पंचनामे करणे चोर शोधण्याचे आश्वासन देणे हा पोलिसांचा नित्यक्रम झालेला आहे चोऱ्यांचे सत्र थांबले नाही तर ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेतील असे जमलेल्या ग्रामस्थांनी सांगितले
