चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सी.ई.टी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
चंदनापुरी येथील चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये यावर्षी सी.ई.टी व बारावीला प्रथम आलेला विद्यार्थी कु.चैतन्य सुधाकर पी.सी.एम ९७.२१, कुमारी गुंड पायल अरुण पी.सी.बी ९६.५२, कुमारी वाळे अनुष्का दशरथ पी.सी.बी. ९५.८४, राहणे आकांक्षा जालिंदर पी.सी.एम ९१.९३, राहणे सार्थक सुनील ९१.६३, कुमारी राहणे जीविका रामहरी ९१.०५, पी.सी.एम.८०.७४,रावत रंजना दिलबरसिंग पी.सी.बी ९०.३२ , पोखरकर तनुजा रत्नाकर डीसीएम ८९.३३, धोबी श्रेया चंद्रकांत पीसीबी ८९.२२, वाळे सपना पांडुरंग पी.सी.बी ८७.२५, नेहे आशिष दादाभाऊ जे.ई.ई-८२.१७, पी.सी.एम.८४.८८, गुंजाळ साक्षी दिनकर पी.सी.बी ८७.१२ या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने खर्डे चैतन्य सुधाकर, राहणे सार्थक सुनील, चि. नेहे आशिष दादाभाऊ, कुमारी गुंड पायल या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
पालकांच्या वतीने नेहे दादाभाऊ किसन, रावत मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विज्ञान शाखेला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार पालकांच्या व संस्थेच्या वतीने करण्यात आला
प्राचार्य अशोक खेमनर, उप प्राचार्य श्री कैलास रहाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदराव कढणे, श्री विठ्ठलराव कढणे, श्री रामदास रहाणे, अनिल कढणे,, अशोक राहणे पालक ,गुणवंत विद्यार्थी, शिक्षण शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
