जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
अकोले / लोकवेध live न्यूज
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*
अकोले – दि.२१ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात माध्यमिक विद्यालय टाकळी विद्यार्थी व शिक्षकवृंद, ग्रामपंचायत टाकळी पदाधिकारी, आरोग्य विभाग स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यगण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनानिमित्त टाकळी शाळेचे ज्येष्ठ पदवीधर शिक्षक श्री. दत्तात्रय देवगिरे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह योगासनांचे विविध प्रकार करून दाखविले. तसेच टाकळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.पोतदार सर व श्री. देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील योगसाधनेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सरपंच दत्तूभाऊ गरुड, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. जनार्दन मोरे, संतोष भाऊ नाईकवाडी, दादा पाटील तिकांडे उपस्थित होते. योग दिनानिमित्त टाकळी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे व देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी श्री. अनिल गायकवाड यांनी विद्यार्थी व शिक्षकांना आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. टाकळी शाळेचे ज्येष्ठ उपाध्यापक श्री.संजय शिंदे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
