पिंपरणे ग्रामस्थांनी आश्वी बु येथे होणाऱ्या अप्पर तहसील प्रस्तावाची केली होळी 
पिंपरणे ग्रामस्थांचा कडाडून विरोध..
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी राजकीय उद्देशातून आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करून त्यामध्ये संगमनेर शहरालगतची अनेक गावे जोडण्याचा सत्ताधाऱ्यांनी घातलेला घाट उलथून टाकण्यासाठी गावागावांमधून निषेध होत असून पिंपरणे  येथून निषेध नोंदवत गावकऱ्यांनी कडाडून विरोध करत अप्पर तहसील प्रस्तावाची होळी केली
संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असूनही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सततच्या विकास कामांमुळे हा तालुका राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. येथील सहकार , शिक्षण,ग्रामीण विकास, अर्थव्यवस्था ही काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी संगमनेर तालुक्याला मोडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
प्रशासनाच्या सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड सुरू असून शहरालगत ची अनेक गावे आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयात जोडली आहे. ही वार्ता कळताच  संगमनेर तालुक्यात मोठी संतापाची लाट उसळली.
यानंतर पिंपरणे गावामधून तरुणांनी याबाबत मोठी जनजागृती केली असून गावामधून ग्रामसभा घेऊन या निर्णयाविरुद्ध ठराव तयार करून ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले. यासाठी पिंपरणे  येथे मोठी ग्रामसभा होऊन या निर्णयाला ठाम विरोध करण्यात आला तर  ग्रामस्थांनी एकत्र येत प्रस्तावाची होळी करत  या नवीन निर्णयाचा तीव्र विरोध केला.
हा निर्णय रद्द न केल्यास संपूर्ण गाव रस्ता रोको उपोषण करेल असा इशाराही पिंपरणे ग्रामस्थांनी दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!