डी के मोरे जनता विद्यालयात अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 

सह्याद्री संस्थेचे डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान  ता.संगमनेर येथे योग दिन  साजरा  झाला असल्याची माहिती  प्राचार्य साहेबराव कोल्हे यांनी दिली आहे.

         21 जून जागतिक योगदिनाच्या निमित्ताने विद्यालयात 1350 विद्यार्थ्यानी *21 JUNE YOGA DAY या इंग्रजी अक्षरांमध्ये  विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके  केली. आज  सर्व जगामध्ये योग दिन साजरा होतो आहे.21 जून हा दिवस योग दिन आहे याचे औचित्य साधून व योगाचा प्रचार व प्रसार अधिक व्हावा हाच  सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आला.
        ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब  यांनी साकारली . त्यांना प्रा. काकड सर व सर्व प्राध्यापक,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. योगशिक्षक  बाळासाहेब कांडेकर सर यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिके करून दाखवली.यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे, उपमुख्याध्यापीका श्रीमती पवार एल.आर  इन्चार्ज ज्यु. कॉलेज, प्रा.बाबा  गायकवाड  व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  यांनीही योग प्रात्यक्षिके केली . कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ शूटिंग विवेक काशीद यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!