आश्वी येथील अप्पर तहसील च्या निर्णयाविरुद्ध कनोलीत निषेध व्यक्त 
 कनोली ग्रामस्थ आक्रमक गावात निषेध सभा घेत संताप व्यक्त केला 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना घेऊन राज्यात विकसित ठरलेल्या संगमनेर तालुक्याचा  विकास मोडण्याचा कुटिल डाव करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. तालुका विभाजन करून संगमनेर मधील जनतेला त्रास देण्यासाठी पालकमंत्री व प्रशासनाने आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय नियोजित केले आहे.या  निर्णयाविरुद्ध संगमनेर तालुक्यातील कनोली गावात निषेध सभा घेत अश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास कडाडून विरोध करण्यात आला आहे.
 याचबरोबर तातडीने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.  यावेळी तरुणांसह  नागरिक यांची मोठी उपस्थिती होती
हा अन्यायकारक निर्णय लाभल्यास संगमनेर तालुका पेटून उठेल आणि मोठे जन आंदोलन उभारण्यातील असा एकमुखी ठराव गावांमधून घेण्यात आला.आता संगमनेरकर एकवटले असल्याने आगामी काळामध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!