एकविरा फाउंडेशन व इन्फिनिटी योगा स्टुडिओच्या वतीने योग दिन साजरा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
एकविरा फाउंडेशन व इन्फिनिटी योगा स्टुडिओ यांच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या यावेळी समवेत इन्फिनिटी योगा स्टुडिओचे मार्गदर्शक रितेश सोनवणे यांचे सह संगमनेर मधील विविध योग प्रशिक्षक , युवती व शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी बोलताना कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, प्रत्येकासाठी स्वतःचे आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र माणूस धावपळीच्या जीवनात भौतिक सुखाकडे लक्ष देत आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातून अनेक समस्या उद्भवतात. मानसिक शारीरिक आरोग्याबरोबर कौटुंबिक व सामाजिक आरोग्य ही बिघडते. मन शांती व एकाग्रतेसाठी योग हा अत्यंत उपयुक्त ठरतो याचबरोबर दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ही योगाचा फायदा होतो.
म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी योगा करणे गरजेचे असून आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती असल्याने आरोग्याची काळजी घ्या असे आवाहनही कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केले आहे
तर रितेश सोनवणे म्हणाले की, योग दिन हा इव्हेंट म्हणून न पाहता आरोग्य जपण्याच्या मंत्र देणारा दिवस म्हणून पाहिला पाहिजे एक दिवसा करता योगा न करता दररोज केला पाहिजे नियमितता हे योगाचे मोठे वैशिष्ट्य असून चांगल्या आरोग्यासाठी नियमित योग करा असे आवाहनही त्यांनी केले
यावेळी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 300 युवती व विद्यार्थिनींनी सह पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी ही योग दिनात सहभागी घेतला.
