चल गं सखे चल कुरडया पापड बनवायला
ग्रामीण भागात कुरडया पापड्या बनवण्याची लगभग सुरू
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
उन्हाळा सुरू झाला की, महिलांमध्ये वाळवणी पदार्थ बनवायची लगबग सुरू होते. ग्रामीण व शहरी भागात सध्या हेच चित्र असून, लोणच, विविध पापड, कुरडया, शेवाया आणि मसाले हे पदार्थ तयार करण्यात महिला व्यस्त आसंतात
हे वाळवणाचे पदार्थ घरात असावेतच यासाठी महिलांची धडपड सुरू असते. याशिवाय विविध मसाले, लोणचेही तयार करण्याचे काम महिलावर्गात सुरू झाले आहे.
ग्रामीण भागात महिला गावातील शेजारपाजारच्या बायकांना बोलावून कुरडया पापड्या बनवण्यासाठी एकमेकींना मदत करतात तर कुरड्या पापड्या बनवत असताना त्यांच्यामध्ये धार्मिक गाणे म्हणण्याची भजन म्हणण्याची उखाणे घेण्याची चांगलीच जुगलबंदी रंगते असे काहीसे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
सध्या हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया, कुरडया, बाजरीच्या खारोड्या, हरभरा डाळीचे सांडगे (वडे), ज्वारी, तांदळाचे पापड, चकल्या, उडीद डाळीचे वडे, पापड, बटाट्याचे चिप्स आदी वाळवणाचे पदार्थ तयार केले जात आहेत. वर्षभर घरात वेगवेगळ्या वेळी किंवा सणवारी कोणी नातेवाईक आले तर त्यांच्या पाहुणचारासाठी ते पदार्थ तळून बनवले जातात.
शेवया तयार करण्याचे यंत्र आल्याने रोजगार तयार झाला आहे. तर काही महिला रोजंदारीवर मदत करत असल्याने त्यांनाही रोजगार मिळाला आहे. शिवाय ग्रामीण भागात अनेक महिला या व्यवसायात सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेत आहेत. व्हॉटस्अँपच्या माध्यमातून उन्हाळी वाळवण बनविण्याची ऑर्डर घेत आहेत व त्यातून चांगल्या प्रकारे मोबदला मिळत आहे.
सध्या ग्रामीण भागात जिकडे तिकडे घरगुती खाण्याचे कुरड्या, पापड करण्याचे काम प्रत्येक गावात सुरूआहे. आम्ही गावातील महिला आपल्या गल्ली तील महिला ऐकमेंकाना सहकार्य करुण कुरडया,शेवई उडीदाच्या दाळीचे पापड, गव्हाच्या शेवया, नागलीचे पापड , तांदुळ गव्हाचे पापड आदी सामान एकत्र येऊन करतो. हे सामान एक वर्षाचा असते. आणी ह्या वस्तु करतांना फार काळजी घ्यावी लागते. कुरड्या, पापड मार्केटलाही मिळतात,मात्र त्याचा पाहीजे तसा स्वाद लागत नाही.त्यामुळे आजही ग्रामीण भागातील ह्या सामानाची चवही एक वेगळ्या प्रकारची स्वाद पुर्णं असते.
प्रतीक्षा काळे गृहिणी
ग्रामीण भागातल्या विविध प्रकारच्या रंगबेरंगी कुरडया, पापड , शेवया यांना शहारात मोठी मागणी कायम असुन महिलांबचत गट घरच्या घरी ह्या सर्व वस्तु मध्ये सर्वसामान माफशीर टाकून स्वादिष्ट बनवून शहरात विक्रीसाठी देखील पाठवतात . त्यात त्यांना चांगले पैसे देखील राहतात, प्रत्येक सणाला गोडधोंड करुण खाण्याची आपली पध्दत असल्याने वर्षभरपुरेल इतका सामान महिलांमंडळ या दिवसामध्ये एकमेंकाच्या सहकार्याने बनवत असतात. तर बाहेरगावी पुणे, मंबुई, सुरत या ठिकाणी आपल्या नातेवाईकाकडे पाठवत असतात.
मनीषा बागुल बचत गट सीआरपी
