महायुतीपेक्षा वंचितची भारी राहणार रणनीती ; महाविकास आघाडीत झाली बिघाडी ; वंचितच बसवणार विस्थापितांची घडी ; ॲड प्रकाश आंबेडकरांच्या सभेला जमणार तुफान गर्दी
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
महायुती आणि महाविकास आघाडीत मानसन्मान न मिळाल्याने आपली आवक वाढणार असून
भविष्यात वंचित बहूजनच आघाडीवर राहणार असून अनेकजण वंचितची
पायरी चढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांची ही हाक वंचितच तारणार असून अनेकांना न्याय मिळेल असे चित्र येत्या काही काळात उभे राहणार असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमध्ये पदासह अन्य गोष्टीसाठी कुरघोड्याचे राजकारण सुरू असून नाराजी खदखद शिजत असल्याचेही समोर येत आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की, तो सर्वसमावेशक सामाजिकीकरणातून लोकशाहीचे हाथ बळकट करणार आहे. सत्तेसाठी पिपासू बनलेल्यांना जनता कदापिही माफ करणार नाही. लोकसभेच्या
होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने लिंगायत समुदाया बरोबर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले नसल्याने याचा परिणाम दोन्ही पक्षाला भोगावा लागणार असल्याचे दिसून येत असून वंचित बहुजन आघाडीने सर्वसमावेशक जाती धर्माला एकत्रित बांधण्यासाठी आपली मोट बांधून भरभक्कम असा आराखडाच तयार करण्याचे काम केले आहे. असे मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ब्राह्मण सवर्ण ,मुस्लिम लिंगायत आदि समुदायाला प्रतिनिधित्व देत त्यांना वंचित न ठेवता तब्बल 48 जागावर आपला विजय प्रस्थापित करण्यासाठी सक्षम फळी उभी केली असल्याचे आता स्पष्ट होत आहे. एकूणच महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरणच बदलू पाहणाऱ्या वंचित आघाडीला बऱ्यापैकी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये केवळ फोडा, मोडा, आणि तोडा याच धरतीवर पक्षाची ध्येय धोरणे अवलंबवली जात असल्याचेही सांगत वंचित बहुजन आघाडी मध्ये फक्त जोडा हेच तत्त्व अंगीकारत लोकशाही ,संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आणि जनहित जपण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चांगली सरसावल्याचे दिसून येत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की, श्रीरामपूर येथे होऊ घातलेल्या प्रचार सभेला ॲड.
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती समुदायाला एकत्रित घेऊन हा लढा सक्षम करणार असून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲड
बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घटकाला सक्षम करत त्यांना न्याय देऊन मतदार संघाचा विकास करणार असल्याचे रूपवते यांनी सांगितले .
